बीडबीड जिल्हा

डिटेक्ट डायग्नोस्टिक ॲडव्हान्स पॅथॉलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी लॅब च्या माध्यमातून शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल- नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर

बीड,शहरातील दिप प्लाझा, वैद्यनाथ बँकेशेजारी मराठवाड्यातील अत्याधुनिक अशा डिटेक्ट डायग्नोस्टिक ॲडव्हान्स पॅथॉलॉजी & मायक्रोबायोलॉजी लॅबचे उदघाटन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, या अत्याधुनिक लॅबच्या माध्यमातून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे रुग्णांना त्यांच्या रिपोर्ट्ससाठी आता दोन-तीन दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. त्यांचे रिपोर्ट्स हे एक दिवसात उपलब्ध होणार असून रुग्णाच्या आजाराचे निदान लवकर होणार आहे. बीड शहर वैद्यकीय क्षेत्रात आता भरारी घेत असून आधुनिक उपचार पद्धती आता इथेच उपलब्ध होत आहेत. शहरात होणाऱ्या नवनवीन विकसित वैद्यकीय सुविधांमध्ये आता डिटेक्ट लॅबची देखील भर पडली असून त्यांनी रुग्णांना अचूक रिपोर्ट्स व दर्जेदार सेवा पुरवावी असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे व विठाई हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीहरी लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या लॅबचे डॉ.अंजली नाईकवाडे, डॉ.मयुर भोसले, डॉ.संतोष ताठे, डॉ.श्रीकांत ओव्हर यांच्यासह त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button