बीडबीड जिल्हा

वर्क्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची जडणघडण होते – विजयसिंह पंडित

अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिस वितरण

वर्क्तृत्व स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते, त्यामुळे अशा स्पर्धांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या कठिण संक्रमण काळात सुध्दा राजेश्‍वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदराव देशमुख व त्यांच्या सहकार्यांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वर्क्तृत्व स्पर्धांचे उत्कृष्ट आयोजन केले असे प्रतिपादन विजयसिंह पंडित यांनी केले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजेश्‍वर चव्हाण, गोविंदराव देशमुख, पत्रकार दत्ता देशमुख, संजय तिपाले, रघुनाथ कुचेकर, रविंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त वसुंधरा महाविद्यालयाच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन दि.१ ते ८ जून दरम्यान करण्यात आले होते. शालेय आणि महाविद्यालयीन गटासाठी संपुर्ण महाराष्ट्रातून ७० पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवार, दि.११ जुलै रोजी शिवछत्र, बीड येथे संपन्न झाला. या समारंभाला माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंदराव देशमुख, अंबाजोगाई तालुका समन्वयक समितीचे अध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण दै.सकाळचे जिल्हा प्रतिनिधी दत्ता देशमुख, दै.पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी संजय तिपाले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य रघुनाथ कुचेकर, माजी सरपंच रवि देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला विजेते स्पर्धक व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रु.५०००, रु.३००० व रु.२००० रोख रक्कमेसह प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदान’ आणि ‘जनतेच्या प्रश्‍नांशी भिडणारा नेता – अमरसिंह पंडित’ या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

शालेय गटातून अनुक्रमे माळकर शांभवी श्रीकांत (शिरोळ, कोल्हापूर), शेळके साधना दादासाहेब (गेवराई), परळे प्रसाद संतोष (सज्जनगड, सातारा) आणि उत्तेजनार्थ कदम स्नेहल सुभाष (सोनपेठ) यांनी तर महाविद्यालयीन गटातून अनुक्रमे घावट महेश तुकाराम (मुरबाड, जि.ठाणे), केंद्रे तेजस्विनी नाथराव (औरंगाबाद), निकम आशितोष पृथ्वीराज (सातारा), खराद रुपाली भाऊसाहेब (अंबड, जि.जालना) यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके मान्यवरांच्याहस्ते वितरीत करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक कु.क्रांती गोगुले (गेवराई), सुनिल चव्हाण (सुरळेगाव), कु.वैष्णवी जगताप (गेवराई), कु.अनघा जोशी (बीड), कु.सोनाक्षी गुंडेवार (गेवराई) आणि कु.आश्‍विनी पवार (बीड), कु.आनंदी नंदकुमार दाभाडे (गेवराई) यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद्र देशमुख यांनी केले, सुत्रसंचलन प्रा.जोगदंड आणि सत्यप्रेम लगड यांनी केले. यावेळी स्पर्धक आणि त्यांचे पालक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम घेण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button