बीडबीड जिल्हा

नियोजन, स्मार्ट वर्क, मेहनतीतून मोसंबी फळबाग यशस्वी होते – डॉ एम बी पाटील

साधुसंत, मोसंबी तज्ञ, उत्पादक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत लोळदगाव येथे मोसंबी फळपूजन

बीड ) लोळदगाव/शहाजानपुर (आहेरचिंचोली) ता. गेवराई येथे साधुसंत, मोसंबी संशोधक, विक्रमी मोसंबी उत्पादक शेतकरी, नवीन लागवड केलेले शेतकरी, शेती, सामाजिक व विविध क्षेत्रात काम करत असलेले व्यक्तिमत्त्व यांच्या उपस्थितीत शेतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नाविन्यता आणणारे श्री दिलीप अण्णा गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच श्री कैलास आबा नलावडे यांच्या केवळ पाच वर्षांमध्ये उत्कृष्ट जोपासलेली तोडणीस आलेल्या रसरशीत फळांच्या मोसंबी बागेतील “फळ पूजनाचा” कार्यक्रम संपन्न झाला.

शिरस मार्ग आणि सभोवतालच्या पंचक्रोशीतील आठ-दहा गावांमध्ये तब्बल 5 हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर मोसंबी पिकाची लागवड झालेली तसेच श्री क्षेत्र नारायणगड परिसराच्या सानिध्यात असलेल्या इतरही 20 ते 25 गावांत मोसंबी बागांची लागवड झालेली आहे. मोसंबी हे पीक निसर्गाच्या लहरीत पणामुळे ओला /कोरडा दुष्काळ अतिवृष्टी या सर्व काळामध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले असल्याने या पिकाकडे शेतकऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने पाहून लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी या भावनेने प्रातिनिधिक स्वरूपात या फळपूजनाचे आयोजन श्री नलावडे यांच्या आयोजनातून करण्यात आले.

आता शिरस मार्ग हे गाव आणि परिसर राज्यभरात मोसंबी हब म्हणून ओळखले जात असून गेल्या 15 वर्षात ही लागवड मोठ्या प्रमाणात वाढती आहे. आज प्रतिनिधिक तत्वावर लोळदगाव येथे फळपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हिमायत नगर औरंगाबाद येथील मोसंबी/केशर आंबा संशोधन केंद्राचे डॉ.श्री.एम.बी.पाटील साहेब, रानडे ॲग्रो पुणे चे श्री. के.जी.शाहीर साहेब यांनी मोसंबी पिकाबद्दल उपस्थित शेकडो शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले.

बीड जिल्ह्याकडे दुष्काळी जिल्हा म्हणून बघितले जात असताना श्री क्षेत्र नारायणगड संस्थाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने नारायणगड पंचक्रोशी आणि परिसर पाण्याच्या उत्कृष्ट नियोजनातून आता मोसंबी हब बनलेला असून उत्पादनासह विक्री व्यवस्थापन देखील आता या भागातील मोसंबी उत्पादक करू लागले आहेत. शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याने उपलब्ध पाण्यात आपल्या उपलब्ध असलेल्या क्षेत्रापैकी वीस गुंठे ते एक/दोन एकर ते पाण्याचे नियोजन पाहून आपल्याला शक्य असेल तेवढ्या क्षेत्रावर फळपीक लागवड करणे आवश्यक आहे. माती परीक्षण, खताचे नियोजन, स्मार्ट वर्क, नियोजनातून मोसंबी फळबाग यशस्वी होऊ शकते असे औरंगाबाद येथील मोसंबी संशोधक श्री एम बी पाटील म्हणाले. रानडे ऍग्रोचे श्री शाहीर यांनी मोसंबी फळबाग लागवडीसाठी आवश्यक तयारी, पिकाचे नियोजन, बहार धारणा, खत, सिंचन, कीडसंरक्षण आदींबाबत ईतनभूत मार्गदर्शन केले. यावेळी या परिसरातील तसेच जिल्हाभरातील मोसंबी उत्पादक शेतकरी व महिला/ पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोसंबी संशोधक,शास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम बीड जिल्ह्यातील तमाम मोसंबी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा कार्यक्रम एक पर्वणी ठरलेला आहे.
या कार्यक्रमास उपस्थित मार्गदर्शनपर आशीर्वादासाठी महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत शिवाजी महाराज आणि यांच्यासोबतच हभप महंत लक्ष्मण महाराज मेंगडे नेकनुर, हभप महंत शिवाजी महाराज देशमुख नेवासा, हभप महंत रामकृष्ण बापू रंधवे महाराज पाटोदा, हभप महंत जनार्धन महाराज शिंदे, हभप महंत स्वामी योगीराज महाराज, हभप महंत सुरेशानंद कोळेकर महाराज, हभप महंत संभाजी महाराज, हभप धुराजी महाराज कोळेकर आदींनी शुभाशीर्वाद दिले. यावेळी लोळदगाव शिरस मार्ग परिसर व पंचक्रोशीतून मोसंबी/फळ उत्पादक प्रगतशील शेतकरी जयसिंह भाऊ पंडित, प्रगतशील शेतकरी व समता परिषदेचे जालना जिल्हा अध्यक्ष नवनाथराव वाघमारे, श्रीराम नर्सरी आडुळचे मालक दादाराव पाटील वाघ,नारायणगडचे विश्वस्त ऍड महादेव तूपे, अनिल दादा जगताप, सीए भानुदास जाधव, प्रगतशील शेतकरी कल्याणराव कुलकर्णी धुनकवाड, प्रसिद्ध व्यापारी संतोष सोहनी, संभाजी पवळ, अनिल पवळ, शंकर पवळ, पांडुरंग कोळेकर, मधुकर पवळ, बप्पासाहेब तांबारे, अशोक पवळ, बबनराव मुळे, भगवान गाडे, कल्याण जेठे, बळीराम रसाळ, बळी जिजा चव्हाण,नाना गुरसाळी महाराज, योगेशराव शेळके, रावसाहेब रकटे, अशोक पांढरे, अशोक गोरे, महादेव घाटे, सुभाष गोरे, राधाकिशन गोरे, भागवत गोरे, पंडित गव्हाणे, मनोज घुमरे मोसंबी उत्पादक शेकडो शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानदेव काशीद यांनी केले तर कैलास नलावडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते. धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज व त्यांच्यासोबतच्या सर्व मठाधिपती/ महंतांचे संत पूजन करून स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली…

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button