बीडबीड जिल्हा

आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाच सागर!

नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते बंधार्‍याचे भुमिपुजन

  • कामखेडा पं.स.गणात 4 कोटी 12 लक्ष रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पण
    बीड:- गेल्या पंचवीस वर्षापासून सत्तेत असणार्‍यांना जो विकास करता आला नाही ती विकास कामे आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून पुर्ण होत असून विकास कामांचा सागर ग्रामीण भागात पोहचवीला जात आहे. बंधार्‍यांच्या कामांमुळे शेतकर्‍यांना पाणी साठ्याचा मोठा आधार मिळणार आहे. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते गेटेड बंधार्‍याचे भुमिपूजन करण्यात आले तर कामखेडा पं.स.गणातील 4 कोटी 12 लक्ष रूपयांच्या विकास कामाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
    बीड तालुक्यातील कुमशी, कांबी, कामखेडा, दगडी शहाजानपूर, पारगाव सिरस, सोनगाव, साक्षाळपिंप्री आणि बेलुरा व इतर कामखेडा पं.स.गणातील विविध ठिकाणचे विकास कामाचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात आले. कुमशी येथे सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लॉक, कांबी येथे सिमेंट रस्ता, पथदिवे, कामखेडा येथे सिमेंट रस्ता,पथदिवे,जि.प.शाळेसमोर पेव्हींग ब्लॉक, दगडी शहाजानपूर येथे जि.प.शाळेसमोर पेव्हींग ब्लॉक, सिमेंट रस्ता, दगडी शहाजानपूर ते सौंदाणा रस्ता, पथदिवे, पारगाव सिरस येथे 1 कोटी रूपयाचा कोल्हापुरी बंधारा, डांबरी रस्ता, सिमेंट रस्ता, खुली व्यायाम शाळा, पथदिवे, सोनगाव येथे गेटेड बंधारा, गावातील मुख्य रस्ता, पथदिवे, सिमेंट रस्ता, खुली व्यायाम शाळा, साक्षाळपिंप्री येथे गावांतर्गत रस्ता, सौर पथदिवे, खुली व्यायाम शाळा तर श्री क्षेत्र नारायणगड येथे 55 लक्ष रूपयांच्या गेटेड बंधार्‍याचे भुमिपुजन नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बेलुरा येथील 55 लक्ष रूपयांचा गेटेड बंधारा, रूद्रापुर येथील 55 लक्ष रूपयांचा गेटेड बंधारा, बेलुरा-रूद्रापुर रस्ता, गावांतर्गत रस्ता, पेव्हींग ब्लॉक, शाळाखोली बांधकाम व इतर विकास कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर म्हणाले की, या भागातील जनतेनं स्व.काकु-नानापासून प्रेम दिले आहे. आपले प्रेम आणि आशिर्वाद असेच पाठिशी राहु द्या, विकासाचा वेग वाढवून टप्प्याटप्याने आपले प्रश्न मार्गी लावतो. आपल्या दारात येवून अनेक प्रश्नांची सोडवणूक करत आहे. यापुढेही विकास कामे प्राधान्याने पुर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. आ.संदिप भैय्यांच्याम माध्यमातून बीड मतदार संघातील विविध प्रश्न मार्गी लावले जात आहे. या भागातील रस्ते, सिंचन व मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आ.संदिप भैय्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांना बळ द्या असे आवाहन यावेळी माजी आ.सय्यद सलीम यांनी केले. कामखेडा पं.स.गणातील 4 कोटी रूपयांच्या विकास कामांचे लोकार्पण करतेवेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव उबाळे, पंचायत समितीचे सभापती बळीराम गवते, संजय गांधीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर, पंचायत समिती सदस्य सचिन शेळके, मोहन देवकते, किशोर काळकुटे, भगवान बहिर, गोटु आबा बहिर, अनिल बनकर आदी जण उपस्थित होते.

    बंधार्‍याच्या कामांमुळे शेतकर्‍यांना होणार फायदा
    बीड मतदार संघात सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे, शेतकर्‍यांना पाणभरती शेती करता यावी यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर प्रयत्नशिल असल्याचे दिसून आले आहे. आपल्या मतदार संघात कोल्हापुरी बंधारे, गेटेड बंधारे मंजुर करून आणत ते उभारून ओढ्या, नदी, नाल्यावरील पाणी अडवले गेल्यामुळे याचा शेतकर्‍यांना मोठा फायदा होणार असल्याने शेतकरी बांधव आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानत आहेत.

साक्षाळपिंप्री ते बीड रस्त्याचाही प्रश्न मार्गी
आ.संदिप भैय्यांच्या माध्यमातून साक्षाळपिंप्री ते बीड रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. आ.संदिप भैय्यांनी सीआरएफमधुन या रस्त्यासाठी 9 कोटी तर अर्थसंकल्पीय अधिवेशनातून 3 कोटी व शहरातील अंबिका चौक ते करपरा नदीपर्यंत सिमेंट रस्ता व नाली बांधकामासाठी 6 कोटी रूपयाचा निधी मंजुर करून आणला आहे. गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न मार्गी लावल्याने साक्षाळपिंप्री येथील ग्रामस्थांनी आ.संदिप भैय्यांचे आभार मानले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button