गेवराईबीड जिल्हा

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून गेवराई तालुक्याला साडे चौदा कोटी रुपये मंजूर

अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित बंधूचा विकास यज्ञ सुरुच

गेवराई  ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या प्रयत्नाने गेवराई तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत १४ कोटी ३९ लाख रुपये किंमतीच्या रस्ता कामास मंजूरी मिळाली असून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांचे गेवराई विधानसभा मतदारसंघातून आभार मानले जात आहेत.

सत्ता असो नसो सदैव विकासाचा ध्यास घेतलेले माजी आमदार अमरसिंह पंडित आणि माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदारसंघात नेहमीच विकासकामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग २११ ते निपाणी जवळका-पाचेगाव-तळवट बोरगाव-जळगाव मंजरा या साडे सोळा कि.मी. लांबीच्या १४ कोटी ३९ लाख ७९ हजार रुपये किंमतीच्या रस्ता कामास प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. सदर रस्ता कामास लवकरच प्रारंभ होणार असून या भागातील जनतेची रस्ते बांधकामाची मागणी आता पुर्णत्वास जाणार आहे. दरम्यान निपाणी जवळका पाचेगाव , तळवट बोरगाव,जळगाव मंजरा परिसरातून माजी आमदार अमरसिंह पंडित आणि माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे आभार मानले जात आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button