बीड जिल्हा

नाळवंडी गटातील ‘त्या’ पीककर्ज रखडलेल्या शेतकऱ्यांसाठ आ सुरेश धस धावून आले

एसबीआय कर्ज रक्कम नियमानुसार भरणाऱ्या त्या 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यासाठी विभागीय व्यवस्थापकांना दिले पत्र

बीड – बीड तालुक्यातील नाळवंडी गटात असलेली गावे एसबीआय जालना रोड शाखेकडे कृषी कर्जासाठी दत्तक होती. पीककर्ज व्यतिरिक्त इतर कृषी कर्ज असलेल्या 283 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ऋण समाधान योजना व ओटीएस चा लाभ घेऊन नियमानुसार रक्कम मार्च 2021 पूर्वी भरली होती. या शेतकऱ्यांपैकी फक्त 40 शेतकऱ्यांना आतापर्यंत बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आले आहे मात्र उर्वरित शेतकऱ्यांना अद्यापही बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही.

3 जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असलेले विधानपरिषद आमदार सुरेश धस यांच्याकडे यातील शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. तात्काळ विभागीय व्यवस्थापकांना पत्र व फोनद्वारे संपर्क करून शेतकऱ्यांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आ सुरेश धस यांनी केली. कोरोना आणि अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी परेशान आहेत. सदर बेबाकी प्रमाणपत्र एसबीआय बँकेकडून लवकर मिळाल्यास सर्व शेतकऱ्यांना पिककर्जाचा लाभ मिळेल.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button