गेवराईबीड जिल्हा

टक्केवारी घेऊन मिंदे झालेल्यांच्या तोंडी ‘प्रामाणिक प्रतिमा’ शब्द शोभत नाही – विजयसिंह पंडित

गेवराई ) : नगर परिषदेच्या लेखापरीक्षण अहवालात तुमची प्रामाणिक प्रतिमा लोकांनी पहिली, शहरातील सरकारी जागेवर अतिक्रमण लोक पाहत आहेत, वाळू, रेशन मधील हिस्सेदारी लोकांनी अनुभवली, गुत्तेदारांकडून मिळणाऱ्या टक्केवारी मुळे मिंदे झालेल्यांना भ्रष्ट कामाची तक्रार देण्याची सोय राहिली नाही, अशा भ्रष्ट सम्राटांना प्रामाणिक प्रतिमा वगैरे शब्द शोभत नाहीत, अशी खरमरीत टिका विजयसिंह पंडित यांनी केली आहे. आ.लक्ष्मण पवार यांच्या पत्रकबाजीला त्यांनी उत्तर दिले.

ज्याला स्वतःचे कर्तृत्व दाखविण्यासारखे काम नसते ते कर्तव्यशून्य लोक दुसऱ्यावर टीका करून स्वतःची टिमकी वाजवून घेत असतात, मागील पाच वर्षे केवळ रेशनिंगच्या नावाखाली लोकांना फसवून एकाचे दुकान दुसऱ्याला जोडून दलाली खाण्याचा उदयोग केला. गोरगरीब, विधवा आणि निराधारांच्या मानधनात दलाली केली असे दलाल आता प्रामाणिक प्रतिमेची भाषा करत आहेत म्हणजे मोठा विनोद आहे. भाजपच्या या विनोदी सम्राटांनी पत्रकबाजी करून मतदारांची करमणूक सुरू केली आहे असा टोला बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी लगावला आहे. पाहिल्यावेळी साठ हजारांचे मताधिक्य घेणाऱ्यांना निवडणूक प्रचारात माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराने तोंडाला फेस आणला होता, त्याची जाणीव असू द्यावी तुमची प्रतिमा प्रामाणिक असती तर पैसे देऊन निवडणूक जिंकावी लागली नसती, असेही विजयसिंह पंडित यांनी सांगितले.

नाक कापलं तरी भोक शिल्लक आहे अशा विचारसरणीच्या लोकांना विकासावर बोलण्याचा अधिकार नाही. कोरोनाच्या वाईट संक्रमण काळात लोकांनी तुम्हाला रेशनिंगचा काळाबाजार करतांना पाहिलं, खजिगी बाजार समितीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोळ करतांना रंगेहाथ पकडलं, नगर परिषदेच्या माध्यमातून शौचालय बांधकाम गैरव्यवहार करतांना तुम्ही सापडलात, वाळू उपसा आणि वाहतूक यात तुमचे बागलबच्चे अडकलेत हे सर्व लोकांना माहीत झाले आहे, आता स्वछ व प्रामाणिकपणाची झालर ओढून स्वतः ला पांघरुन घेऊ नका असे विजयसिंह पंडित यांनी सांगितले आहे.

शेवटी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले आम्ही गुत्तेदारांकडून टक्केवारी घेत नाहीत म्हणून छातीठोकपणे त्यांच्या तक्रारी करू शकतो, तूम्ही टक्केवारीत मिंदे आहात म्हणून गप्प बसून आहात असा टोला त्यांनी आ. लक्षण पवार यांच्या टिकेला उत्तर देताना लगावला .

०००

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button