बीडबीड जिल्हा

मनाच्या श्रीमंती बरोबरच तनाची श्रीमंती देखील महत्त्वाची- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड,कुठल्याही व्यवसायांमध्ये तनमनधनाने झोकून देऊन प्रामाणिकपणे काम केले तर त्यात नक्कीच यश मिळते मनाच्या श्रीमंती बरोबरच मनाची श्रीमंती देखील तितकीच महत्त्वाची ठरू लागली असून जिम च्या माध्यमातून तरुणांना मजबूत शरीर यष्टी कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे बीड सारख्या ठिकाणी ही सेवा खूप महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

आज शहरातील धानोरा रोड परिसरातील गुजर टॉवर येथे सी एन एस या अत्याधुनिक जिमचे उदघाटन शिवसेनेचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर व महाराष्ट्र श्री, भारत श्री, सिलिब्रेटी ट्रेनर मनीष अडवीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना युवा नेते तथा न.प.सदस्य डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी उपस्थित राहून या जिम चे डॉ.इलियास खान व विजय गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर इस्कॉनचे अध्यक्ष कृष्णभक्त प्रभूजी, आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर विरेष धोत्रे, सी.एशिया चॅम्पियन जुबेर शेख, पुणे श्री शेख मुजफर,डॉ अजीज जहेर बिल्डर,अख्तर भाई,अरुण डाके,विलास बडगे,नगरसेवक गणेश वाघमारे, भैय्या मोरे,रणजित बनसोडे,मोईन मास्टर, फारूक पटेल, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ.इलियास खान व विजय गायकवाड यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.

यावेळी बालताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, अवघ्या काही वर्षातच तरुणांमध्ये मध्ये जिमच्या खेळाच्या माध्यमातून उत्साह निर्माण झाला आहे, एक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना डॉ इलियास यांनी बीड शहरात अद्यावत अशा जिमच्या शाखा निर्माण करून तरुणांना मजबूत शरीरयष्टी कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे विशेष म्हणजे महिलांसाठी असलेली ही जिम ची व्यवस्था मराठवाड्यात एकमेव आहे बीड सारख्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असते खूप महत्वाचे झाले आहे जिम बरोबरच घोडेस्वारी चे ट्रेनिंग देखील दिले जात आहे खेळांमध्ये अनेक तरुणांनी यश मिळवले आहे क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव जगात घेतले जाते उत्कृष्ट शरीरयष्टी कमवण्यासाठी जिमचा योग्य उपयोग होऊ लागला आहे मनाच्या श्रीमंती बरोबरच तनाची श्रीमंती देखील महत्त्वाची आहे,बीड शहराची ओळख सीएनएसच्या जीम मुळे होऊ लागली आहे, कोरोना काळात बीड सारख्या ठिकाणी बॉडी बिल्डर स्पर्धा घेता आल्या नाहीत मात्र आगामी काळात मात्र त्या स्पर्धा घेऊन बीडच्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल असे सांगून त्यांनी संचालकांना शुभेच्छा दिल्या यावेळी तरुण आणि मित्र वर्ग उपस्थित होता

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button