गेवराईबीड जिल्हामराठवाडामहाराष्ट्र

राष्ट्रवादी चित्रपट कलाकार सेलच्या वतीने वृक्षारोपणाचे आयोजन

गेवराई  ) -राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट, नाटय, साहित्य सेलच्या वतीने गेवराई येथे बीजारोहण व वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ११ वा.तालुका व शहर शाखेच्या वतीने गेवराईजवळील पालख्या डोंगरावरील खंडोबा मंदिराजवळ बीजारोपण व वृक्षांचे रोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.पर्यावरण, ऑक्सीजनचा विचार करून निसर्गाच्या सानिध्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी , सदस्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अध्यक्षांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रणित कलाकार सेलच्या अध्यक्षपदी कलावंत शेखर मोटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित कलाकार पदाधिकाऱ्यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मोटे यांनी संघटना मजबूत करण्याबरोबरच सर्वांना एकत्र घेऊन कार्य करु असे म्हणाले. आभार शहराध्यक्ष कलावंत आनंद दाभाडे यांनी मानले.बैठकीस विभागीय उपाध्यक्ष शाहीर विलासबापू सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र बरकसे, प्रा. शरद सदाफुले,महेश नागरे, अंकुश आतकरे, सुमेध भोले, सुंदर कांबळे, कैलास टोणपे, दत्ता लाड आदी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button