बीडबीड जिल्हा

सीड प्लॉट, खत-बियाणे कमतरतेच्या अनुषंगाने आ सुरेश धस यांनी अकोल्याला जाऊन महाबीज व्यवस्थापकांची घेतली भेट

बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता असणाऱ्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना सीड प्लॉट द्यावेत - आ सुरेश धस

बीड :- मराठवाड्याला दुष्काळी, अवर्षण आदींचा सामना सातत्याने करावा लागतो आहे. विभागातील बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यात या अस्मानी संकटासह सोयाबीन सह इतर बियाण्यांची कमतरता, उपलब्ध झालेच तर दर्जाहीन बियाणे आदी प्रश्न भेडसावत असतात. बियाण्याच्या कमतरतेवरून पेरणीचा काळ लांबल्याचा गोंधळ गेला काही वर्षांपासून पाहण्यास मिळत आहे. याच अनुषंगाने अकोला येथील महाराष्ट्र राज्य महाबीज मंडळ येथे मुख्य व्यवस्थापकांना भेटून मराठवाडा विभागातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणीसह सर्व जिल्ह्याना खत – बियाण्यांचा तुटवडा भासू नये असे पूर्वनियोजन करणे, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक सिंचन उपलब्धता असणाऱ्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाणे उत्पादन सिद प्लॉट देण्यात यावेत अशी मागणी भाजपचे विधानपरिषद आ सुरेश धस यांनी अकोलास्थीत मंडळाच्या कार्यालयात मुख्य व्यवस्थापक श्री फुंडकर व इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन केली.

मराठवाड्यातील बीडसह इतर जिल्ह्यात सोयाबीन व इतर लागवडीचे प्रमाण अधिक असणाऱ्या पिकांच्या बियाण्याची कमतरता हि ऐन पेरणीवेळी मोठ्या प्रमाणात जाणवते, बियाण्याचा काळाबाजार फिरवतो, ऐनवेळी बियाणे उपलब्ध न झाल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पेरणीचा महत्वाचा असणारा वेळ निघून जातो व शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. यामुळे बियाण्याचा तुटवडा पडू नये तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर, वडवणी, धारूर, केज, अंबाजोगाई(राडी, धानोरा सारखी बीजउत्पादन अनुभव असणारी गावे), परळी आदींसह लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उन्हाळी सिंचनाची उपलब्धतता असणाऱ्या तालुक्यांमध्ये बियाणे उत्पादनाची क्षेत्रे/सीड प्लॉट द्यावीत जेणेकरून स्थानिक ठिकाणीच बियाणे उपलब्ध होईल व त्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल अशी मागणी आ धस यांनी महाबीजकडे केली. बियाण्यांसह नवनवीन खत निर्मितीचे उद्योग बीड जिल्ह्यात राबविण्यात यावेत असे आ धस म्हणाले. यावेळी महाबीजचे उत्पादक व्यवस्थापक श्री फुंडकर,गुणवत्ता नियंत्रक श्री लहाने,प्रक्रिया व्यवस्थापक श्री पांगरुत आदींसोबत आ सुरेश धस यांनी खत – बियाणे व यासंबंधीच्या नवनवीन उद्योग, उपक्रम बाबत चर्चा केली.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button