जालनामराठवाडा

मेघा कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान शेतात पाणीच पाणी

नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी उपविभागीय अधिकारी परतूर यांना केले निवेदन सादर

आष्टी)शेगाव पंढरपूर 548 या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या मेगा इंजिनिअरिंग कंपनी च्या चुकीच्या कामामुळे रस्त्याच्या कडीला असलेल्या शेती पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई मिळावी यासाठी परतूर उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना शेतकऱ्याने लेखी निवेदन सादर केले आहे.

शेगाव पंढरपूर रस्ता निर्माण कामामध्ये अभियंत्या कडून शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात न घेता रस्ता निर्माण केला असल्याने शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे ऊसाचे पिक पूर्णतः पाण्यात बुडून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नुकतेच समोर आले आहे.
लांडकदरा ता परतूर येथील शेतकरी श्री राजाराम लिंबाजी सुरवसे यांच्या सावंगी शिवारातील गट नंबर 153 मधील ऊस लागवड केलेल्या एक हेक्टर 99 आर जमिनीत पूर्णपणे पाणी साचले असून लागवड केलेले ऊस पिक पूर्णतः वाया गेले आहे,याबाबत महसूल विभागाच्या वतीने पंचनामा देखील करण्यात आला असून शेतकरी सुरवसे यांनी याबाबत मेगा कंपनीला जबाबदार ठरविले आहे, शेतातील पाणी जाण्यासाठी कसल्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्यानेच उभे पीक वाया गेले असल्याने झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी राजेभाऊ सुरवसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button