बीडबीड जिल्हा

बीड ते नगर हा जवळपास 140 की.मी. जिव्हाळ्याचा असलेला रस्ता हा लवकरच चार पदरी हायवे होणार!

आ.सुरेश धस यांनी दिले ना. नितीन गडकरी यांना मागणीचे निवेदन.

नागपूर येथे केंद्रीय रस्ते विकास,वाहतूक मंत्री मा. ना. श्री नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ या बीड ते अहमदनगर एकूण किलोमीटर १४०.७७५ लांबी असलेल्या आणि १ हजार ५० कोटी किंमतीच्या मार्गावरील चार टप्प्यात कामांना तात्काळ मंजुरी देण्यात येऊन लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे.हा मार्ग चौपदरी दर्जाचा होणार आहे.तसेच प्रमुख शहराच्या लगत असलेल्या सर्व्हिस रोड देखील करण्यात येणार तसेच याबाबत सकारात्मक चर्चा होऊन लवकर सर्व प्रश्न मार्गी लावू असे ना.गडकरी साहेब यांनी आश्वासन दिले.यावेळी जवळपास अर्धातास ना.गडकरीसाहेब व आ.सुरेश आण्णा धस यांच्यात सविस्तर चर्चा झाली. मागणीचे निवेदन देताना आ.सुरेश आण्णा धस,जि. प.माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला,जि. प.सदस्य माऊली जरांगे,जि. प.सदस्य ॲड प्रकाश कवठेकर,माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,पाटोदा नगराध्यक्ष बळीराम पोटे,माजी सभापती अंकुश चव्हाण,सरपंच अनिल ढोबळे, संदीप खकाळ,नगरसेवक संतोष मुरकुटे,असिफ सौदागर,दीपक तांबे,अशोक सुपेकर,सरपंच सुधीर पठाडे,अनिल काथखडे,सरपंच राम धुमाळ,उपसरपंच सागर धोंडे, किरण शिंदे, अभय पवार,ज्ञानेश्वर मुरकुटे,शरद देसाई,अजय गुंड,अविनाश विधाते ,आदी शिष्टमंडळासह भेट घेतली.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button