बीडबीड जिल्हा

बीडमध्ये ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अँजीओग्राफी,अँजीओप्लास्टीचे मोफत महाशिबीर

आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या संयोजनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उपक्रम

बीड ):- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या संयोजनातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बीडच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट येथे अँजीओग्राफी, अँजीओप्लास्टी मोफत तपासणी महाशिबीराचे आयोजन करण्यात आले असून हृदयरोग रूग्णांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. गरजुवंतांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष तथा काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटलचे संचालक डॉ.बालाजी जाधव, संचालक अजित वरपे यांनी केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखशली बीडमध्ये आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या संयोजनातून राष्ट्रवादी काँग्रेस पाटी बीड तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक व समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.21 जुलै ते 21 ऑगस्ट तब्बल एक महिनाभर काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट बीड येथे तज्ञ डॉ.अमित दुल्लरवार यांच्यासह आदी तज्ञ मंडळींच्या उपस्थितीत अँजीओग्राफी, अँजीओप्लास्टी मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यात कोणत्याही प्रकारे तपासणीसाठी फिस आकारली जाणार नाही. लोकोपयोगी आरोग्यदायी या उपक्रमातील मोफत तपासणी महाशिबीराचा गरजुवंतांना लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष तथा काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटलचे संचालक डॉ.बालाजी जाधव, संचालक अजित वरपे यांनी केले आहे.

अँजीओग्राफी,अँजीओप्लास्टी मोफत तपासणी करण्यासाठी आजच नाव नोंदणी करा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने हृदयरोग रूग्णांसाठी अँजीओग्राफी, अँजीओप्लास्टी मोफत तपासणी करण्यासाठी काकू-नाना मेमोरीयल हॉस्पिटल व मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट बीड येथे ज्ञानेश कुलकणी मो. 9066367777, विष्णु चोले मो.7218734243 यांच्याकडे आजच आपली नाव नोंदणी करा असे आवाहन काकू-नाना मेमोरीयल रूग्णालय प्रशासनाच्या करण्यात आले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button