बीडबीड जिल्हा

रस्त्यांचे कामे दर्जेदार होतील, निधी कमी पडू देणार नाही – विजयसिंह पंडित

११ कोटी ४४ लक्ष रुपये किंमतीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ

गेवराई, ) मागील पाच वर्षांच्या काळात गेवराई विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीमध्ये मागे पडला, जनतेने टाकलेल्या विश्‍वासाचा विरोधकांनी घात केला. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अमरसिंह पंडित यांनी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून १४ कोटी रुपयांचा निधी मंजुर करून आणला. सातत्याने पाठपुरावा करून सदरील कामास प्रशासकीय मंजुरी मिळवली परंतु स्वतःला कार्यसम्राट म्हणवून घेणार्या आणि आपल्याच धुंदीत असणार्या विद्यमान आमदाराने झोपेतून उठून सदरील कामाच्या उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. एैत्या पिठावर रेघोट्या ओढणार्या आणि आपण आणलेल्या कामाचे श्रेय लाटणार्या कार्यसम्राटाच्या भुलथापांना बळी पडू नका असा सनसनीत टोला लगावत सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार होतील आणि येणार्या काळात गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये विविध विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ११ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या विविध रस्ते बांधकामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत गेवराई विधानसभा मतदार संघातील आंतरवाली ते मिरगाव-पांगुळगाव ते प्रजिमा २६ या ९.५० किमी लांबीच्या ७ कोटी १७ लक्ष रुपये किंमतीच्या, प्रजिमा २१ ते ठाकुरवाडी तांडा या २.२५ किमी लांबीच्या १ कोटी ७८ लक्ष रुपये किंमतीच्या, प्रजिमा २४ ते गुळज या १.७५ किमी लांबीच्या १ कोटी २१ लक्ष रुपये किंमतीच्या आणि रामा ५० ते काठोडा या १.७५ किमी लांबीच्या १ कोटी २८ लक्ष रुपये किंमतीच्या विविध रस्ते बांधकामाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्याहस्ते सोमवार, दि.१९ जुलै रोजी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, नगरसेवक शाम येवले, दिपक आतकरे, गोरख शिंदे, किशोर कांडेकर, भाऊसाहेब माकले, ऋषिकेश बेदरे, दत्ता दाभाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गेवराई तालुक्यातील काठोडा येथे सायं. ४ वाजता मिरगाव येथे सायं. ५ वाजता, ठाकरवाडी येथे सायं. ६ वाजता आणि गुळज येथे रात्रौ ७ वाजता सदरील कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सातत्याने पाठपुरावा करून गेवराई तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी मंजुर करून आणला, परंतु विरोधकांनी मात्र या कामाचे श्रेय लाटण्याचा सपाटा लावला आहे. जी कामे मागे व्हायची होती ती झाली नाहीत, आता आम्ही करत आहोत तर विरोधकांच्या पोटात पोटसुळ उठत आहे. कोविडच्या या अडचणीच्या काळात महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेवराई विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष दिले. अमरसिंह पंडित यांचा शब्द पक्षामध्ये प्रमाण मानला जातो, त्यामुळेच ही विकासाची कामे तालुक्यात होत आहेत. सदरील कामे दर्जेदार होतील, रस्त्यांसह इतर मुलभूत सुविधांसाठी यापुढील काळातही अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करू, विकास कामांसाठी कसल्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, त्यासाठी कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता कामाला लागावे असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी दिनेश घोडके, अक्षय पवार, भागवत दहिवाळ, मोहसनी शेख, वसीम फारुकी, युवराज जाधव, आदित्य दाभाडे, आनंद दाभाडे, रवि दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, उदय पानखडे, युनूस फंटर, सलीम पाशा, सय्यद नौशाद, रफिक शेख, अजीम शहा, वशिष्ट शिंदे, अमित वैद्य, नंदु झाडे, बाळासाहेब हिंगले, बंडू घाटूळ, शिवाजी गोडबोले, किरण वावरे, विशाल उमप, अजिंक्य वावरे, सुभाष हुंबे, पिंटू पवार, माऊली बोंद्रे, संतराम निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम घेण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button