बीडबीड जिल्हा

मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेवून २४ मो.सा. , ०१ बोलेरो पिकअप , ०७ मोबाईल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बीड जिल्हायात मोटार सायकल व मोबाईल चोरीचे गुन्हयात वाढ झाल्याने सदरची बाब मा.पोलीस अधीक्षक साहेब , बीड यांनी गंभीरतेने घेवून दिनांक ०१/०७/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांना एक विशेष पथक नियुक्त करुन जिल्हयात चोरीस गेलेले मोबाईल , मोटार सायकल व आरोपीची माहिती काढून चोरी गेलेले मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करणे बाबत आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , बीड यांनी स्था . गु.शा. , बीड येथील एक पोलीस अधिकारी व ०५ अंमलदार यांचे पथक तयार केले . सदर पथकाने दिनांक ०२/०७/२०२१ ते दिनांक १ ९ / ०७ / २०२१ रोजी पर्यंत ( ०८ ) इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून एक बोलेरो एक बोलेरो कंपनीचे पिकअप , एक स्कुटी किं .५.५०,००० / – रु . व { ०७ ) मोबाईल किं , १,००,००० / – रु.चे असा एकूण ६,५०,००० / – रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे . आज दिनांक २०/०७/२०२१ रोजी विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोटार सायकल चोरीचे आरोपींचा शोध घेत गढी येथे असतांना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , शेख एकबाल उर्फ अणू व त्याचा मित्र अजय राठोड दोन्ही रा.गेवराई हे दोघे दोन चोरीच्या मोटार सायकलसह गेवराई येथून गढीकडे येत आहेत . अशी खात्रीलायक माहिती मिळालेवरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गढी येथील उड़ान पुलाचे । खाली सापळा लावून थांबले असता वरील बातमीतील दोन्ही इसम गेवराईकडून गढीकडे येत असल्याचे दिसल्याने त्यांना थांबवून त्यांना त्यांचे नाव , गांव विचारले असता १ ) शेख एकबाल उर्फ अस्पृ शेख अहेमद वय ३२ वर्षे २ ) अजय बबन राठोड वय २२ वर्षे दोन्ही रा.गेवराई यांना त्यांचे ताब्यातील स्प्लेंडर व HF डिलक्स मोटार सायकल व कागदपत्राबाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देवून समाधानकारक माहिती दिली नाही म्हणून त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपुस केली असता शेख एकबाल उर्फ अणू याने सांगीतले की , मी अजय राठोड व आमचा एक साथीदार यांनी चकलांबा येथून एक महिण्यापुर्वी एक स्प्लेंडर मोटार सायकल व चार महिण्यापूर्वी शेवगाव जि.अ.नगर येथून HF डिलक्स मोटार सायकल चोरुन आणलेली आहे . त्यांना अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी सांगीतले की , आम्ही आमच्या एका साथीदाराचे मदतीने जालना , आरंगाबाद , अहमदनगर , सांगली , कोल्हापूर , नाशिक , कल्याण येथून एकुण ( २३ ) मोटार सायकली चोरी करुन आणलेल्या आहेत . चोरलेल्या मोटार सायकलपैकी ( ०३ ) मोटार सायकल गेवराई येथे अजय राठोड याचे घरी ठेवल्या असून बाकी मोटार सायकल अजय राठोड याचे मदतीने त्याचे गावातील लोकांना फायनान्सच्या गाड्या असून काही रक्कम घेवून व कागदपत्र दिल्यानंतर उर्वरीत रक्कम द्या , असे सांगून विकल्याचे सांगीतले . ज्यांना गाडया विकल्या त्यांना संपर्क करुन त्यांचेकडून ( १८ ) मोटार सायकल जमा केल्या . अशाप्रकारे वरील दोन्ही आरोपीकडून एकूण ( २३ ) चोरीच्या मोटार सायकल हस्तगत केल्या . ताब्यात घेतलेल्या मोटार सायकलमध्ये हिरो होंडाशाईन ( १० ) , स्प्लेंडर ( ०६ ) , HF डिलक्स ( ०३ ) , युनीकॉर्न ( ०२ ) , पॅशन प्रो . ( ०१ ) , LM फ्रिडम ( ०१ ) अशा कंपनीच्या गाड्या असून मो.सा.चे इंजिन व चेसीज क्रमांकावरुन मालकी हक्क व चोरीबाबत खात्री केली असता , एक मोटार सायकल पो.स्टे.चकलांबा येथील गुरनं १४७/२०२१ कलम ३७ ९ भादवि मधील असल्याचे निष्पन्न झाले व बाकी मोटार सायकलपैकी जालना येथून ( ० ९ ) , औरंगाबाद येथून ( ०७ ) , अहमदनगर येथून ( ०२ ) , सांगली येथून ( ०१ ) , कोल्हापूर येथून ( ०१ ) , नाशिक येथून ( ०१ ) , कल्याण यधून ( ०१ ) अशा एकूण ( २३ ) मोटार सायकल चोरुन आणलेल्या आहेत , चोरीच्या मोटार सायकल बाबत संबंधीत जिल्हयात विचारपुस केली असता मोटार सायकल चोरी संबंधाने विविध पो.स्टे.ला गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहेत . वरील दोन्ही आरोपींना पो.स्टे.चकलांबा गुरनं १४७/२०२१ कलम ३७ ९ भादविचे तपासकामी गुन्हयातील चोरलेल्या मोटार सायकलसह एकूण ( २३ ) चोरीच्या मोटार सायकल सोबत हजर केले आहे . पुढील तपास चकलांबा पोलीस करीत आहेत , ज्यांच्या मोटार चोरी गेल्या आहेत , त्यांनी पो.स्टे.चकलांबा येथे संपर्क साधावा . दिनांक ०१/०७/२०२१ ते दिनांक २०/०७/२०२१ रोजी पर्यंत स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ( १० ) आरोपींना ताब्यात घेवून त्यांचेकडून एकूण ( २४ ) मोटार सायकल , ( ०१ ) बोलेरो पिकअप , ( ०७ ) मोबाईल असा एकूण १४,६०,००० / – रु.चा माल हस्तगत केला आहे . सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा , बीड येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button