अंबाजोगाईबीड जिल्हा

प्रयत्नात सातत्य ठेवल्याने नक्कीच यश मिळते – गटशिक्षणाधिकारी श्री.चंदन कुलकर्णी साहेब

जिल्हास्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद... 3071 विद्यार्थ्यांचा सहभाग

अंबाजोगाई ) येथील संकल्प विद्या प्रतिष्ठान च्या वतीने 19 जुलै रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाइन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या परीक्षेमध्ये जिल्ह्यातील अंदाजे 175 शाळेचे तब्बल 3071 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संजय गंभीरे यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प विद्या प्रतिष्ठान अंबाजोगाई यांनी जिल्हास्तरीय ऑनलाइन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये इयत्ता चौथी ते दहावी चे विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा परीक्षा मराठी व इंग्रजी या भाषेतून दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धा परीक्षेसाठी 50 प्रश्न 100 गुण आणि 1:00 तास वेळ देण्यात आला होता. या स्पर्धा परीक्षेमध्ये लहान गटामधून चि. वरद विवेक देशमुख प्रथम तर द्वितीय क्रमांक कु.अनुष्का गिरीधर मुळजे मोठ्या गटामध्ये कु.अनुष्का संतोष केकान प्रथम तर द्वितीय चि. संस्कार ओंकार स्वामी या विद्यार्थ्यांनी यांनी पटकावला. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र ,शाल ,श्रीफळ रोख रक्कम 1000/- रुपये देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी श्री.चंदन कुलकर्णी साहेब हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय नगरसेवक संजय गंभीरे ,स्वर रत्न सुभाष शेप , जिजाऊ विद्यालयाचे कार्यवाह एॅड. दयानंद लोंढाळ सर, प्रा.कैलास चोले सर होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी श्री.चंदन कुलकर्णी साहेब बोलताना संकल्प विद्या प्रतिष्ठान च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या कामामध्ये सातत्य आहे, त्यामुळेच या लॉक डाऊन च्या काळातही आपण विद्यार्थ्यासाठी ज्ञानदान करत आहात. त्याचेच हे यश आहे असे, म्हणून एक प्रकारची संस्थेच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिली. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून संजय भाऊ यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सुभाष भाऊ शेप व दयानंद लोंढाळ सर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून, संस्थेने घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे नमूद करून संस्थेसह विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव मुंडे सर यांनी केले तर आभार संकल्प विद्या मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडे मॅडम यांनी मानले. यावेळी सर्व मित्र परिवार या कार्यक्रमास उपस्थित होता.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button