परळीबीड जिल्हा

ना. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

आरोग्य सेवा सप्ताहाचा होणार समारोप

परळी  —- : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परळी येथे सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रम व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

परळीतील मोंढा मैदान येथे सायंकाळी 6.00 वा. हा कार्यक्रम संपन्न होणार असून, या कार्यक्रमात 10000 गरजू महिलांना मोफत साडी वाटप करण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील नगर पालिकेंतर्गत मंजुरी मिळालेल्या 121 घरकुलांच्या पहिल्या हफत्याचे त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या 100 घरकुलांच्या चेकचेही वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात पंचायत समिती अंतर्गत 850 विहिरींच्या मंजुरीचे पत्र, रमाई घरकुल योजनेंतर्गत मंजूर घरकुलांचे 350 चेकचे वाटप तसेच पशुधन कर्जाच्या चेकचेही वाटप करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमांनंतर ना. अजितदादा पवार यांच्या अभिष्टचिंतानाचा कार्यक्रम संपन्न होणार असून, यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह आ. संजय भाऊ दौंड, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

आरोग्य सेवा सप्ताहाचा समारोप

ना. धनंजय मुंडे यांच्या 15 जुलै या जन्मदिनापासून ते ना. अजितदादा पवार यांच्या जन्मदिनापर्यंत (22 जुलै) या सात दिवसात परळीत राबविण्यात आलेल्या आरोग्य सेवा सप्ताह या उपक्रमाचा समारोप देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

या उपक्रमात मागील 5 दिवस महारक्तदान शिबीर, नेत्र तपासणी, सर्व रोग निदान शिबीर, भव्य लसीकरण मोहीम यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.

करोना विषयक नियमांचे पालन करून या कार्यक्रमाना उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परळी वैजनाथ नगर परिषद, पंचायत समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button