परळीबीड जिल्हा

प्रभू वैद्यनाथाची सेवा तर पिढ्यानपिढ्या सुरूच राहील, सोबतच आता विकासाची कावड वाहू – ना. धनंजय मुंडे

अजितदादा पवार यांचा वाढदिवस परळीत विविध विकास कामांच्या शुभारंभाने साजरा

  • परळी : ना. मुंडेंच्या हस्ते वैद्यनाथ मंदिर परिसरातील भक्त निवास, 33/11 केव्ही उपकेंद्र, तसेच दोन रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन संपन्न

घनशी नदीवरील साखळी बंधाऱ्यावर केले जलपूजन

परळी — : परळीतील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची सेवा आम्ही पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत व पुढेही पिढ्यानपिढ्या ती सुरूच राहील, श्रावण महिन्यात गंगेतील पाणी घेऊन येणारी कावड आम्ही कधी चुकू दिली नाही, तशाच पद्धतीने आता विकासाची ‘कावड’ वाहू असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

तीर्थक्षेत्र विकास योजनेतून शहरातील जुन्या तहसीलच्या भागात बांधण्यात येत असलेल्या भव्य यात्री (भक्त) निवास यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, या कामाचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भूमीपूजन करण्यात आले.

परळी शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे, मात्र कमीत कमी वेळेत ही कामे पूर्ण करून देण्यात येतील असे धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार रस्त्यावरील कचरा व धूळ शोषून घेण्यासाठी आणलेल्या अत्याधुनिक स्वीपर (व्हॅक्युम मशीन) मशीनचीही ना. मुंडेंनी पाहणी केली व अशा मशिन्स आणण्याच्या सूचना दिल्या

या भूमीपूजन समारंभास ना. मुंडे यांच्यासह आ. संजयभाऊ दौंड, वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख, नगराध्यक्षा सौ. सरोजनीताई हलगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, जि. प. गटनेते अजय मुंडे, रा.कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बाबासाहेब देशमुख, नंदकिशोर जाजू, प्रदीप देशमुख, अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, नागनाथराव देशमुख, शरद मोहरीर, बाळकृष्ण पूजारी, भास्करराव चाटे, यांसह देवस्थान कमिटीचे सर्व विश्वस्त, पदाधिकारी, न.प.चे सर्व सभापती, पदाधिकारी व सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.

33/11 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन

तत्पूर्वी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील व्हीआयपी सर्किट हाऊस परिसरात महावितरण मार्फत उभारण्यात येत असलेल्या 33/11 केव्ही उपकेंद्राच्या कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. यावेळी ना. मुंडे यांनी उपकेंद्र उभारणी, साईड ट्रॅक आदी संदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी आ. संजयभाऊ दौंड, जि. प. अध्यक्षा सौ. शिवकन्याताई सिरसाट, महावितरणचे मुख्य अभियंता रवींद्र कोळप, अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके, मोहन काळोगे, संदीप चाटे, श्री अंबाडकर यांसह स्थानिक पदाधिकारी व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

शहरातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

परळी शहरातील संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालय व दोस्ती टी हाऊस ते अग्रवाल आईस फॅक्टरी या दोन सिमेंट रस्त्यांच्या कामांचेही ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. एका स्वागत कमान आणि नगरसेवक भाऊसाहेब कराड यांच्या संपर्क कार्यालयाचे यावेळी उदघाटन करण्यात आले.

घनशी नदीवर जलपूजन…

परळी ते चांदापुर रस्त्यावरील घनशी नदीवर नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेले साखळी बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झाले.

या सर्व कार्यक्रमाला वरील सर्व मान्यवर प्रा. मधुकर आघाव , वैजनाथ सोळंके, सभापती सौ. उर्मिला ताई मुंडे, रा. कॉ. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. संगीता ताई तुपसागर, गोपाळ आंधळे, सी.ओ. अरविंद मुंडे, शेख अन्वर, सौ. गंगासागर शिंदे, जाबेर भाई, राजेंद्र सोनी, , दिनेश गजमल, तुळशीराम पवार, संतोष शिंदे, डॉ. विनोद जगतकर, संजय फड, विजय भोईटे, अनिल अष्टेकर, राजा खान, जाफर खान, संतोष रोडे, यांसह नगरसेवक, पदाधिकरी आदी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button