जालनामराठवाडामहाराष्ट्र

गौर बंजारा शिक्षण सेवा अभियान उचलणार गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी

आष्टी- परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि.25 रोजी गोर बंजारा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांच्या सूचनेनुसार गोर बंजारा ब्रिगेड व गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.या बैठकीला अध्यक्ष म्हणून अर्जुन नायक हे उपस्थित होते,यावेळी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पवार,सरचिटणीस संतोष राठोड,अविनाश राठोड,गणेश आढे, परतूर तालुकाध्यक्ष अंकुश आढे, सतीश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गोर बंजारा समाजातील ST आरक्षण, या अभियानाच्या माध्यमातून तांड्यात घराघरात शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये,तांडा तेथे शाखा व वार्ड तेथे बोर्ड,यासह येणाऱ्या काळात गोर बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.
तसेच अर्जुन नायक यांनी बोलताने सांगितले की या अभियानाच्या माध्यमातून समाजातील कुणी पालक स्वतःच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या पाल्याना शिक्षण देऊ शकत नसतील तर त्यांची शैक्षणिक जबाबदारी संपूर्णतः गोर बंजारा शिक्षण सेवा अभियान उचलणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button