आष्टीबीड जिल्हा

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित दोन डी-टाईप रुग्णवाहिकेचे आ.सुरेश धस यांच्या हस्ते लोकार्पण

आष्टी ) भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंञी पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आ.सुरेश धस यांनी आपल्या आमदार निधीतून उस्मानाबाद व लातूर या दोन जिल्ह्याच्या प्रमुख ग्रामीण रुग्णालयासाठी सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले. दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून आष्टी मतदारसंघात पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो. गत दोन वर्षापूर्वी आष्टी-पाटोदा-शिरुर तालुक्यांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, नेत्र शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आरोग्य विषयक तपासणी करुन घेत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. तर यावर्षी आ.सुरेश धस यांनी पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयासाठी सर्व सोयींनी युक्त अशा दोन डी-टाईप रुग्णवाहिकेंचे लोकार्पण शहरातील छञपती शिवाजी महाराज चौक येथे केले.

डी टाईप म्हंटल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक रुग्णवाहिकेमध्ये स्ट्रेचर,व्हील चेअर, ऑक्सिजन, सॅक्शन मशीन, व्हेंटीलेटर मशीन,शुगर तपासणी, बी.पी.तपासणी, ताप मापक, गर्भातील बाळांची तपासणी यंत्र, आपत्कालीन सुविधा, मशीन, प्रथोमोपचार किट, ऑक्सिमीटर आदींची सुविधा उपलब्ध आहे. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ सुरेश यांच्याकडून अशाच 2 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले होते. या रुग्णवाहिकांमुळे शासकीय रुग्णालयात आता कमी वेळात आवश्यक उपचार मिळणे सुलभ होणार असून याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे.
या लोकार्पण वेळी भाजपा उपाध्यक्ष संजय आजबे, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,नगराध्यक्ष भारत मुरकुटे, उपनगराध्यक्ष सुनील रेडेकर,मोहन झांबरे,आत्माराम फुंदे,मच्छिन्द्र धनवडे,सुनील मेहेर,जिया बेग,पत्रकार उत्तम बोडखे,विनोद रोडे,नगरसेवक किशोर झरेकर, दीपक निकाळजे,सरपंच अतुल कोठुळे,सरपंच प्रविण फुंदे,उपसरपंच सागर धोंडे,नितीन मेहेर,राहुल मुथ्था,सचिन लोखंडे,शफी सय्यद,असफाक आत्तार,विजय धोंडे,प्रीतम बोगावत,पत्रकार शरद रेडेकर,गणेश दळवी,सचिन रानडे,प्रविण पोकळे आदी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button