बीडबीड जिल्हा

डॉ.आर.बी. पवार यांचे कोरोना काळातील काम जनता विसरणार नाही

पवार जनतेतला अधिकारी - अँड. अजित देशमुख

बीड  ) साडे तीन वर्ष बीड जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर काम करणारे डॉ. राधाकिशन पवार हे जनतेतले अधिकारी आहेत. कोरोना काळात त्यांनी ग्राऊंडवर घेतलेली मेहनत जनता विसरणार नाही. सातारा येथे त्यांची बदली याच पदावर झाली आहे. ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी आज त्यांचा सत्कार करून भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून जिल्हा परिषदे अंतर्गतच्या संपूर्ण यंत्रणेचा कारभार पाहून कोरोना काळात स्वतःदेखील कोविड सेंटरला भेटी देऊन त्यांनी रुग्ण आणि नातेवाईकांना धीर देण्याचे काम केले. जनतेत जाऊन काम करणारा एक अधिकारी म्हणून जिल्हाने त्यांच्याकडे पाहिलं. आता बीड पेक्षा मोठा असलेला सातारा जिल्हा तिथली आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी त्यांना देण्यात आला आहे.

कुसळंब तालुका पाटोदा येथील रहिवासी असलेले डॉक्टर पवार यांनी कुसळंब येथे पाच कोटी रुपयांची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जवळपास पूर्णत्वाला आणली आहे. या त्यांच्या गावी कोरोना केअर सेंटरचे पहिले उद्घाटन करून त्यांनी कोरोणा केअर सेंटरच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी अनेकांना उपलब्ध करून दिली. आज देखील कुसळंब येथे आडूसष्ट कोरणा बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी काढलेली कोरोना केअर सेंटर आता बंद झाली असली तरी डॉक्टर पवार यांच्या गावचे कोरोना केअर सेंटर मात्र रुग्णांना अजूनही आधार देत आहे.

अधिकारी स्वतः जेव्हा झोकून देऊन काम करतो, तेव्हा त्यांच्या आधिपत्याखाली काम करणारी यंत्रणा निश्चितच सक्रिय राहते. याचा अनुभव जन आंदोलनाने सर्व ठिकाणच्या तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या अधिनस्त काम करणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफ बरोबर काम करताना पाहिले आहे. डॉक्टर पवार यांचे काम पाहून तळापर्यंत काम करणारी अंगणवाडी सेविका देखील कोरोना काळात सक्रिय राहिलेली आपण पाहिलेली आहे.

त्यामुळे डॉ. आर. बी. पवार यांचा जन आंदोलनात तर्फे सत्कार करून त्यांना स्वामी विवेकानंदांचे पुस्तक देखील भेट देण्यात आले आहे. डॉक्टर पवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन साताऱ्यात देखील त्यांच्याकडून अशीच सेवा घडावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी सातपुते सर हे देखील उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button