बीड जिल्हामाजलगाव

दिंद्रुडच्या माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

दिंद्रूड ): – शैक्षणिक वर्षे 2020-21 मध्ये इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत यश संपादन केलेल्या व शाळेतून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा माध्यमिक विद्यालय दिंद्रुडच्या वतीने आज सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव रांजवण यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावर्षी शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी दिंद्रुडच्या माध्यमिक विद्यालयातून एकूण 219 विद्यार्थी बसले होते. शाळेचा निकाल 99.96% लागला आहे. कु.देशमाने स्विटी बालासाहेब हिने 96.80% , कु.रायकर दिव्या दिपक हिने 96.40% तर पारेकर गिता बळीराम हिने 96% घेऊन अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला. चि.भाजीभाकरे कुलभुषण वल्लभ 92%, चि.लिंबाळकर यश दिपक यांनी 91.80% गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे. एकून 16 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त गुण पडले आहेत.
विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य भगवान देशमाने तर प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षक लखमावाड होते. यावेळी पालकही उपस्थित होते. पैकी बळीराम पारेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कुटे सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात कसे यश संपादन करावे याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात देशमाने यांनी मुलांनी आईवडीलांचे व शाळेचे नाव उज्वल करावे असे आवाहन केले. सुत्रसंचलन बारवकर यांनी केले. या सत्कार समारंभासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी सहकार्य केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button