बीडबीड जिल्हा

बीड शहरातील जिरेवाडी ते कोल्हारवाडी रस्त्याचे काम सुरू होणार

आ.संदिप क्षीरसागर यांनी खा.शरदचंद्रजी पवारांच्या माध्यमातून घेतली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींची भेट

  • तांत्रिक अडचणी दूर, आ.संदिप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश

बीड शहरातून जाणारा कोल्हारवाडी बायपास ते बार्शी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक- जालना रोड मार्गे जिरेवाडी बायपासपर्यंत रस्त्याचे विस्तारीकरण, मजबुतीकरण, ड्रेनेज या राष्ट्रीय महामार्ग कामाच्या नुतनीकरणाला आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली परंतू काम सुरू होण्यास अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी लोकनेते, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातील केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत सदर कामातील तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर अडचणी दूर केल्या आहेत. बीड शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याचे काम प्रत्यक्षात लवकरच सुरू होणार आहे.
धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग बीड शहरातून जातो. या रस्त्याला बीड शहराबाहेरून बायपास झाल्याने शहरातील खराब झालेल्या मुळ रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष झाले होते. हा रस्ता दुरूस्त व नुतनीकरण करण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने खा.शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे यांच्याकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासाठी निधीही मंजुर करून दिला परंतू प्रत्यक्षात काम सुरू करण्यास अनेक तांत्रिक व प्रशासकीय पातळीवरील अडचणी येवू लागल्याने काम सुरू होण्यास विलंब होवू लागला. या तांत्रिक बाबी व प्रशासकीय पातळीवरील अडचणी लक्षात घेता आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी प्रकल्प संचालक नागपुर व औरंगाबाद यांच्यासोबत चर्चा करून खा.शरदचंद्रजी पवार साहेब, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेवून सदरील कामातील तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. बीड शहर व तालुक्याच्या दृष्टीकोनातून या रस्त्याचे नुतनीकरण होणे अत्यंत आवश्यक होते. आता या कामाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार असल्याने शहरातील नागरीकांना आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचे आभार मानले आहेत.
चौौ

खा.शरदचंद्रजी पवार, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे मानले आभार
बीड शहरातील बायपास टु बायपास या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी मंजुरी मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल लोकनेते खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मनापासून आभार मानत या नुतनीकरणाला मंजुरी देवून निधी दिल्याबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे देखिल बीड विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी व आमदार म्हणून संदिप क्षीरसागर यांनी विशेष आभार मानले आहेत. यावेळी खा.सुप्रियाताई सुळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचे सभापती अशोक आबा डक उपस्थित होते.

काम पुर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा सुरूच राहिल- आ.संदिप क्षीरसागर
बीड शहर व तालुक्याच्या दृष्टीने या रस्त्याचे नुतनीकरण होणे अत्यंत आवश्यक होते. या नुतनीकरणाच्या कामात काही तांत्रिक बाबी येत होत्या त्यामुळे या कामाला प्रशासकीय मान्यता मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. ते आता खा.शरदचंद्रजी पवार, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, खा.सुप्रियाताई सुळे यांनी दुर केल्यामुळे मार्गी लागल्या आहेत. आता हे काम सुरू होणार असल्याने समाधान वाटते. हे काम लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी देखिल माझा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे आ.संदिप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button