बीडबीड जिल्हा

अंतरिक्षयान प्रपलशन विषयात पीएचडी करत असलेल्या ‘त्या’ विद्यार्थिनीला धनंजय मुंडे यांनी दिला परदेश शिष्यवृत्तीचा विशेष आधार!

मुंबई ) —- : सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी गुणवत्ता प्रक्रियेतून पात्र ठरलेल्या कु. तेजस्विनी शिंदे या ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात ‘अंतरिक्ष यान प्रपलशन’ या विषयात पीएचडी शिकणाऱ्या विद्यार्थिनीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विशेष आधार दिला असून, ऑस्ट्रेलियन विद्यापीठाने मंजूर केलेली स्टायपेंडची रक्कम तिला मिळणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीच्या रकमेतून नियमाप्रमाणे न कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कु. तेजस्विनी शिंदे हिची सिडनी विद्यापीठात अंतरिक्ष यान विषयात पीएचडी साठी 6 देशातील 150 विद्यार्थ्यांमधून निवड झाली असून, ती एकमेव भारतीय विद्यार्थिनी आहे. यासाठी ना. मुंडे ते अगदी इस्रोच्या प्रमुखांनी देखील तिला खास दूरध्वनी करून तिचे अभिनंदन केले होते.

सामान्य कुटुंबातील तेजस्विनीने बँकेतून कर्ज घेऊन आपली पदवि लंडन येथून पूर्ण केली होती. त्यावेळी तिने घेतलेल्या शैक्षणिक कर्जाचा आज तिच्यावर डोंगर झाला होता.

तिची आर्थिक स्थिती पाहून सिडनी विद्यापीठाने कु. तेजस्विनी हिला देय असलेला स्टायपेंड तिच्या शैक्षणिक कर्ज फेडीसाठी व उर्वरित रक्कम तिला शैक्षणिक खर्चासाठी मंजूर केला होता. मात्र स्टायपेंड ची रक्कम तिला अद्याप मिळालेली नसल्यामुळे तसेच कु. तेजस्विनी ही गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिला परीक्षेस बसण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. याचाच विचार करून धनंजय मुंडे यांनी स्टायपेंडची रक्कम शिष्यवृत्तीच्या रकमेतून वजा न करण्याचा निर्णय विशेष बाब म्हणून घेतला आहे.

ना. धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार स्टायपेंडची रक्कम कपात न करता शिष्यवृत्तीचा पूर्ण लाभ देण्याचा आदेश सा. न्या. विभागाच्या अवर सचिव श्रीमती अश्विनी यमगर यांनी विशेष बाब म्हणून निर्गमित केला आहे. ना. मुंडे यांनी परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात सुधारणा करून याआधीही याप्रकारे बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत मिळवून दिली आहे. त्यामुळेच या योजनेचा प्रथमच 100% कोटा पूर्ण झाला आहे.

मुंडे साहेब, माझ्या गगन भरारीचे स्वप्न तुमच्यामुळेच शक्य – कु. तेजस्विनी शिंदे

“स्पेस सायन्स सारख्या विषयामध्ये भारतातून माझी निवड होणे हे माझ्यासाठी ‘गगन भरारी घेण्याचं एक स्वप्न! परदेशात पीएचडी करणाऱ्या मुलांना क्वचितच स्टायपेंड मिळतो. त्यात मी आतापर्यंतचा प्रवास करण्यासाठी शैक्षणिक कर्जही घेतलेलं आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे स्टायपेंड मिळाल्यास ती रक्कम शिष्यवृत्ती मधून कपात केली जाते. परंतु स्टायपेंड केवळ मंजूर आहे, मला अद्याप प्राप्त झाला नाही. त्यात माझी कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नेटाचीच आहे. त्यामुळे आता काय होईल ही चिंता सतावत होती.

मी सामाजिक न्याय मंत्री ना. धनंजय मुंडे साहेबांकडे याबाबत मदत मागितली असता, त्यांनी तातडीने विशेष बाब म्हणून मला परदेश शिष्यवृत्तीचा पूर्ण लाभ, कसलीही कपात न करता देण्याचा निर्णय घेऊन माझे गगन भरारी घेण्याचे स्वप्न शक्य केले आहे. ना. मुंडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांची मी शतशः ऋणी आहे;” अशा शब्दात कु. तेजस्विनी शिंदे हीने आपल्या भावना व्यक्त करत ना. मुंडेंचे आभार मानले आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button