बीडबीड जिल्हा

नगराध्यक्षांनी केला माजी आ.राधाकृष्ण होके पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सपत्नीक सत्कार

बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर यांनी माजलगावात दि.२८ जुलै २०२१ बुधवार रोजी अनेकांच्या घरी जावुन गाठी भेटी घेवुन काहीचे अभिनंदन तर काहीचे सांत्वन केले

स्व.माजी खा.केशरकाकु क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे माजलगाव मतदारसंघात खुप मोठे चाहते व कार्यकर्ते आहेत. त्यांचे सुख दुःख जाणुन घेण्यासाठी बीडचे माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांनी दि.२८ जुलै २०२१ सोमवार रोजी दुपारी माजी नगराध्यक्ष अशोकराव होके पाटील यांच्या निवासस्थाना पासून सुरुवात केली. माजी आ.राधाकृष्ण होके पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राधाकृष्ण होकेपाटील व सौ.जयश्री होके यांचा सपत्नीक सत्कार करून आम्हाला शंभरावी
साजरी करण्यासाठीचा योग लाभावा ही मनोकामना केली आणि बाजार समितीचे माजी उपसभापती सुखदेवराव लंगडे मामा यांच्या पत्नी चे दुःखद निधन झाल्याने लंगडे परिवाराचे सांत्वन केले, ब्रम्हगांवचे माजी सरपंच परमेश्वर खराडे यांच्या मोठा मुलगा बाबा खराडे यांचे कोरोनाने निधन झाल्याने खराडे परिवाराचे ही सांत्वन केले. शिवसेनेचे चे नुतन जिल्हाप्रमुख आप्पासाहेब कडाजीराव जाधव ,माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ता.सचिव काँ.मुसदीक बाबा सर यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या,या वेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव, नगरसेवक विलास विधाते,विष्णू वाघमारे, किशोर काळे, माजी नगरसेवक सुभाष सपकाळ, गिरीश देशपांडे, माजी नगराध्यक्ष अशोकराव होके पाटील, बबनराव सरवदे,सतिष दुगड,दयानंद तोष्णीवाल,माजी उपनगराध्यक्ष तुकाराम येवले, शिवसेना शहरप्रमुख धंनजय सोंळके, अँड.मन्मथ लांडगे, उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button