बीडबीड जिल्हा

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना रुग्णवाहीका पशुपालकांच्या दारात लाभ घेण्याचे आवाहन

बीड,): मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हयात जनावरांच्या उपचारासाठी आता टोल फ्री क्रमांकावर घरपोच रुग्णवाहीका पशुपालकांच्या दारात उपलब्ध राहणार आहे. या योजनेमुळे पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत महापशुधन संजीवणी योजनेत बीड जिल्हयातील वडवणी तालुक्याचा समावेश केलेला आहे. त्यामुळे वडवणी तालुक्याला आता 1962 या टोल फ्री क्रमांकावर घरपोच जनावरांच्या उपचारासाठी रुग्णवाहीका उपलब्ध झालेली आहे. पहिल्या टप्यात बीड जिल्हयात वडवणी तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. गाई,म्हैस, शेळया,मेंढया,कोंबडया यांना, औषधोपचार, लसिकरण, शस्त्रक्रिया, वंधत्व तपासणी, गर्भधारण तपासणी, कृत्रिम रेतन ईत्यादी प्रकारचे सेवा रुग्णवाहीकेतुन उपलब्ध होणार आहेत. तरी वडवणी तालुक्यातील पशुपालकांनी जनावरांच्या आजरासंबंधी सदर टोल फ्री क्रमांक 1962 वर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.आर.व्हि.सुरेवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button