केजबीड जिल्हा

केज येथे स्वयंसहाय्यता बचत गटाच्या ऊत्पादित पदार्थांच्या विक्री स्टॉलचे सभापतींच्या हस्ते ऊद्घाटन.

ऊमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनन्नौती अभियान व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष ,केज स्तुत्य उपक्रम.

महादेव काळे,केज

दुसऱ्याच्या भरोशावर विसंबून न राहता स्वतः ची स्वतः ला मदत व्हावी या ऊद्देशाने शासनाने उमेद महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नौती अभियान सुरु केले असुन त्यामार्फत स्वयंसहाय्यता महिला बचत गट निर्माण करून त्यांना विविध प्रकारच्या व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असुन त्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांची बाजारात विक्री करण्यात येत आहे. त्याचे प्रथम विक्री स्टॉलचे उद्घाटन नुकतेच केज पंचायत समितीच्या प्रांगणात केज पंचायत समितीच्या सभापती सौ. परिमाळाताई घुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणऱ्या,विधवा, परित्यक्ता, अपंग ,निराधार अशा महिलांना आपले कुटुंब चालवण्यासाठी दुसऱ्यावर विसंबून न राहता व दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतः ची स्वता :लाच मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनानाच्या वतीने उमेद महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नौती अभियान राबवण्यात येत असुन ते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील तालुका स्तरावर पंचायत समिती विभागामार्फत चालवण्यात येत असुन या अभियानातंर्गत वरील वर्गातील महिलांचे स्वयंसहाय्यता महिला बचतगट तयार करून त्यांना विविध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची ऊन्नती करण्यासाठी शिकवले जाते. तसेच ऊद्योग व्यवसाया संदर्भाबद्दल प्रशिक्षण देवुन त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तु किंवा पदार्थ याला प्रदर्शनातून बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाते.
त्याचाच एक भाग म्हणून दि.२९ जुलै २०२१ गुरूवार रोजी नुकतेच केज येथे पंचायत समितीच्या प्रारंगाणात उमेद महाराष्ट्र ग्रामीण अभियान व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,केज पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या उत्पादित मालाच्या विक्री स्टॉल लावण्यात आले होते.या स्टॉलचे ऊद्घाटन केज पंचायत समितीच्या सभापती सौ.परिमाळाताई विष्णू घुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन फित कापून केले.उमेद अभियानाच्या अंतर्गत केज तालुक्यात १७८१ महिला बचत गट असुन त्या पैकी १३४० महिला बचत गटाने वेगवेगळे व्यवसाय केले आहेत. त्या पैकी
केज येथील विक्री स्टॉलसाठी एकुण ८ महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे विक्री स्टॉल लावले होते. ज्या मध्ये पापड,पापडी, चिवडा, लाल चटणी , काळा मसाला, हळद,शेवई , आणि ईतरही पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. या स्टॉलच्या उद्घाटन प्रसंगी उपसभापती यांचेसह सभापती पती विष्णू घुले , केज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ,विठ्ठल नागरगोजे , पंचायत समितीचे सर्व सदस्य ऊपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उमेदचे जिल्हा व्यवस्थापक (एम.आय.एस.) शकिल साहेब व त्यांचे सहकारी ऊपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम आयोजित केलेल्या उमेदच्या तालुका अभियान व्वस्थापक नंदा ओव्हाळ ,सर्व तालुका व्यवस्थापक व प्रभाग समन्वयक , स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.अनेकांनी या ठिकाणीच्या पदार्थांची खरेदी करून या पदार्थांचे कौतुक केले. यावेळी बचत गटाच्या महिलांना प्रमुख पाहुणे उमेदचे जिल्हा व्यवस्थापक शकिल साहेब व गटविकास अधिकारी नागरगोजे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक नंदा ओव्हाळ यांनी केले तर आभार प्रभाग समन्वयक ईंम्रानखॉन यांनी मानले.

सोबत फोटो…

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button