ब्रेकिंग न्यूज

पुरग्रस्तांच्या मदतीला धावला कुटे  ग्रुप फाउंडेशन

जिथे मदत पोचली नाही अशा गावातील पाच हजार कुटुंबांना करणार मदत

बीड, : खाद्यतेल, कोकोनट ऑईल, डेअरी आणि इतर उद्योगात आंतराष्ट्रीय ब्रॅन्ड बनलेल्या कुटे उद्योग समुह नेहमीप्रमाणे अद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धाऊन आला आहे. रायगड, रत्नागीरी,सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली जिल्ह्यातील पाच हजार पुरग्रस्त कुटुंबांना थेट मदत करणार आहे. ज्या गावात मदत पोचली नाही, अशा गावात जावून अपद्ग्रस्तांना थेट मदत दिली जाणार असून मदतीची वाहणे रवाना झाली असल्याची माहिती कुटे उद्योग समुहाच्या अर्चना सुरेश कुटे यांनी दिली. यावेळी पत्रकार बांधव उपस्थित होते.
बीड येथे कुटे परिवाराने प्रचंड परिश्रमातून खाद्य तेल उत्पादनाचा प्रकल्प उभा केला. परिश्रमाला प्रामाणिकपणाची जोड देत गुणवत्ता जपली. यामुळे बघता बघता कुटे उद्योग समुहाची उत्पादने आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड बनली. तिरूमलाचे ऑईल, कोकोनट ऑईल केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही लोकप्रीय ठरले. एकीकडे उद्योग- व्यवसायात भरारी घेत असतानाच सुरेश कुटे, अर्चना कुटे, आर्यन कुटे यांनी कुटे ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकीही जपली आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळात कुटे ग्रुप फाऊंडेशनने हजारो कुटुंबांना अन्न- धान्य आणि किराना साहीत्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले. तसेच पोलिस मुख्यालयातील कोरोना सेंटरमध्ये ऑक्जिजन प्लॅट उभा करून गरजूंना याचा लाभ दिला. मागील काही दिवसात कोकण आणि पश्ि­चम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवला. लाखो कुटुंब रस्त्यावर आले असून संसारोपयोगी साहित्यासह घरातील किराना, अन्न- धान्य, कपडे पुरात वाहुन गेले. पुरग्रस्त भागातील परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. अशा या अपत्तीच्या काळात नेहमीप्रमाणे कुटे उद्योग समुह पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आला आहे. कुटुंबातील व्यक्तींना नविन कपडे, टॉवेल, सतरंजी, उबदार शाल, हळद, मिठ, जीरे ईथपासून खाद्य तेल, वापराचे तेल, साबन, टुथपेस्ट, अशा जीनावश्यक सतरा वस्तू, अन्नधान्य याच्या पाच हजार किट तयार करून त्या पुरग्रस्त भागातील गरजू कुटुंबांना वाटप करण्यात येणार आहेत. कुटे ग्रुप फाऊंडेशनच्या या मदतीमुळे ज्या भागात अजूनही मदत पोचली नाही त्या ठिकाणच्या पुरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
घरोघर जावून देणार थेट मदत
या बाबत प्रतिक्रिया देताना आर्चना कुटे म्हणाल्या, पुरामुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. लाखो लोक बेघर झाले असून ज्या भागात लोक मदतीपासून वंचीत आहेत. अनेकवेळा रस्त्याच्या बाजूला असलेल्या गावातील लोकांनाच मदत दिली जाते. खरे यामुळे खरे गरजवंत बाजूला राहतात. असे होऊ नये यासाठी जीथे अद्याप मदत पोचली नाही अशा गावात घरोघर जावून अपद्ग्रस्तांची भेट घेऊन कुटे उद्योग समुह मदतीची किट देणार आहे.
मदतीचा महायज्ञ सुरूच
कोरोना संकट काळात प्रशासनाबरोबर राहून कुटे ग्रुप फाऊंडेशन ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा उभी केली. शासकीय रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांसाठी स्व. ज्ञानोबाराव कुटे यांच्या स्मरणार्थ अन्नछत्र उभे करून दररोज शेकडो रूग्णांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली. गत दोन वर्षांपूवीं सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरात अनेकांचे संसार वाहून गेले होते. या ठिकाणी ग्रुपच्या सदस्यांनी जाऊन मदत केली होती. आताही अनेक जिल्हे पाण्यामुळे बाधीत झाले आहेत. पाच जिल्ह्यात पाच हजार कुटुंबांना कुटे ग्रुप फाऊंडेशनच्या वतीने एक महिना पुरेल ऐवढे अन्नधान्य, उबदार कपडे, साड्या, लहान मुलांचे कपडे यासह जीवनावश्यक असलेल्या साहित्याचे वाटप केले जाणार आहे. सामाजिक कार्यामध्ये कुटे ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो.
अर्चना सुरेश कुटे ( मॅनेजिंग डायरेक्टर, कुटे ग्रुप)

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button