गेवराईबीड जिल्हा

शासकीय कामात टक्का खाण्याच्या वृत्तीमुळे गेवराई भाजपा टक्का पार्टी झाली आहे – अमरसिंह पंडित

पौळाचीवाडीचे सरपंच युवराज जाधव आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत दाखल

गेवराई  ) ः- गेवराई भाजपच्या विद्यमान नेतृत्वाने सर्वसामान्यांसह कार्यकर्त्यांचाही भ्रमनिरास केला आहे. विकास कामांसाठी आलेल्या शासन निधीतील प्रत्येक शासकीय कामात टक्का खाण्याच्या वृत्तीमुळे गेवराई भाजप टक्का पार्टी झाली आहे. टक्केवारीत मिंदे झालेल्यांना भ्रष्ट कामाची तक्रार देण्याची सोय राहिली नाही. अशा निष्क्रीय नेतृत्वाला कंटाळून शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. प्रत्येकाला सन्मान देवून येणार्या काळात कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होवून देणार नाही असा विश्‍वास माजी आ.अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. पौळाचीवाडी येथील सरपंच युवराज जाधव आणि त्यांच्या शेकडो समर्थकांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

पौळाचीवाडी मेथील सरपंच युवराज जाधव मांनी आपल्या शेकडो समर्थकांसह माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजमसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये रविवार, दि.१ ऑगस्ट रोजी जाहिर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, जि.प. सभापती बाबुराव जाधव, सभापती जगन पाटील काळे, जि.प.सदस्य फुलचंद बोरकर, शहराध्यक्ष दिपक आतकरे, नगरसेवक राधेशाम येवले, माजी सभापती कुमारराव ढाकणे, युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेदरे, विद्यार्थीचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, तलवाड्याचे सरपंच विष्णू हात्ते, श्रीराम आरगडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित यांनी गेवराई भाजपवर सडकून टिका केली. ते म्हणाले की, गेवराई तालुक्यातील अनेक तरुण मोठ्या उमेदीने भाजपा सेनेत गेले, पण त्यांनी त्यांना नाऊमेद केले. पंचायत समिती आणि नगर परिषदेमध्ये टक्केवारी दिल्याशिवाय कामे होत नाहीत, निराधारांच्या वेतनापासून ते घरकुलापर्यंत गोरगरीबांकडून सुध्दा हे लोक टक्केवारी घेत आहेत. त्यामुळे येणार्या काळात गेवराई तालुक्यातून भाजप नामशेष करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पंडितांच्या नावाने खडे फोडून सत्ता मिळविणार्यांना आता लोक विकास कामांबाबत जाब विचारू लागले आहेत. जाणीवपूर्वक गलिच्छ राजकारण करून लोकांची कामे अडविण्याचे उद्योग करणार्यांना आता आडवे करण्याची वेळ आली आहे. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा संदेश देवून अमरसिंह पंडित यांनी पक्ष प्रवेश करणार्या सर्व कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणुक देण्याचे आश्‍वासन दिले.

मा कार्यक्रमात सरपंच युवराज जाधव यांच्यासह राजेंद्र जाधव, कृष्णा जाधव, रंगनाथ जाधव, मुकेश जाधव, संतोष जाधव, बाबुराव जाधव, शाम जाधव, विजय जाधव, बाळु जाधव, लहु जाधव, संजय जाधव, लक्ष्मण जाधव, बाबासाहेब वाळेकर, दिलीप मैंद, गणपत पवार, आश्रृबा मैंद, तात्माबा वाळेकर, शंकर वाळेकर, भिमराव सोळुंके, विठ्ठल पवार, शिवाजी मैंद, राजेंद्र राठोड, कृष्णा चव्हाण, अशोक राठोड, अनिल राठोड, मच्छिंद्र राठोड, रामेश्वर राठोड, संतोष राठोड, शिवाजी राठोड, रमेश राठोड, गणेश जाधव, प्रेम राठोड, अनिल राठोड, बाबासाहेब चव्हाण, सुभाष चव्हाण, दिलीप राठोड, अर्जुन राठोड, प्रविण राठोड, सतिष राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्मे प्रवेश केला.

यावेळी युवराज जाधव यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिल्या बद्दल अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांचे आभार मानले आणि इथुन पुढे राष्ट्रवादी पक्ष तन-मन-धनाचे वाढविण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्यासाठी आणि माझ्या सहकार्यांसाठी अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांचा शब्द अंतीम असल्याचेही त्यांनी सांगीतले. याप्रसंगी युवराज जाधव, भाऊसाहेब माखले आदींनी आपले विचार मांडले, प्रस्ताविक भाऊसाहेब नाटकर यांनी केले तर आभार फुलचंद बोरकर यांनी मानले.

कार्यक्रमास विजय पौळ, सुरेश पिकवणे, राधाकिसन शेंबडे, शिवाजी महानोर, सुरेश आहेर, कल्याण चव्हाण, विलास चव्हाण, रामेश्वर पवार, बाबासाहेब आठवले, आवेज शरिफ, शेख मोहसिन, जमसिंग माने, दिनेश कानाडे, भागवत दहिवाळ, अतिम वैद्य, रवि कानाडे, नितीन लोखंडे, गणेश जगताप, राम बोंगाने, उदम पानखडे, शेखर मोटे, ऋषिकेश मोटे, आप्पा ठोसर, संग्राम पंडित, पृथ्वीराज आर्दड, ऋशिकेश सिरसट, जिवन साळवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन संपन्न झाला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button