जालनामराठवाडा

आष्टीत एकाच रात्रीत पाच मेडिकलवर चोरट्यांचा डल्ला;लाखाच्या मुद्देमालाची चोरी

आष्टी( प्रतिनिधी) :- आष्टी ता.परतूर येथे काल दिनांक 1 रोजी च्या रात्री आष्टी येथील पाच मेडिकलवर चोरट्यांनी डल्ला मारला असून यात  लाखाचा मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की काल दिनांक 1 रोजी रात्री बारा ते दीड वाजेच्या सुमारास मोंढा भागतील मुख्य रस्त्यावरील पाच वेगवेगळ्या ठिकाणच्या औषधी दुकान  चोरट्यांनी फोडल्या असुन यात पांडुरंग कल्याण घुले यांच्या विधी मेडिकल मधुन 70 हजार ,लक्ष्मी नारायण सरकटे यांची कुलस्वामिनी मेडिकल मधुन अंदाजे 10 ते 15 हजार ,गणेश लक्षमण काटे यांच्या गणेश मेडिकल मधुन 7 हजार ,बद्रीनारायण आबासाहेब काटे यांच्या गायत्री मेडिकल मधुन 5 हजार व ज्ञानेश्वर विठ्ठल शेळके यांच्या श्री स्वामी समर्थ मेडिकल मधुन 5 हजाराची अशी एकुण 1 लाख 2 हजार रुपये  रोख रकमेची चोरी झाली असुन अनेक ठिकाणी चोरटे सी.सी.टीव्ही मध्ये कैद झालेले आहेत याच्या तपासासाठी सपोनि शिवाजी नागवे यांनी पथक रवाना केले असल्याची माहिती त्यांनी दिली असुन येत्या काही दिवसात आरोपी निष्पन होतील असे सांगितले दरम्यान चोरट्यांनी केवळ औषधी दुकानेच का फोडली या बाबत तर्कवितर्क लावले जात आहेत .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button