जालनामराठवाडा

पाच मिनिटात शंभर योगासने करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड असलेल्या हिंदवी चौरे च्या प्रत्यक्षिकाने आष्टीकर मंत्रमुग्ध

नागरी सत्कार करीत दिले २५ हजाराचे पारितोषिक

आष्टी,अवघ्या नऊ वर्ष वय असलेल्या व पाच मिनिटात ऑनलाइन शंभर योगासने करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड असलेल्या बीड जिल्ह्यातील हिंदवी चौरे या चिमुरडीने आष्टीत केलेल्या वेगवेगळ्या योगासनांच्या कलेने आष्टीकर मंत्रमुग्ध झाले असून आष्टी ग्रामपंचायत ने ११ हजार व गावकऱ्यांनी१५ हजार असे२५ हजाराचे पारितोषिक देत भगवान बाबा नगर व आष्टीत या चिमुरडीचा नागरी सत्कार करीत कौतुकाची थाप तिच्या पाठीवर मारली आहे
मूळ बीड जिल्ह्यातील जीवाची वाडी येथील रहिवासी असलेली हिंदवी परमेश्वर चौरे ही नऊ वर्षाची चिमुरडी सध्या वाशी येथे शेतकरी कुटुंब असलेल्या आई वडिलांसोबत राहते आष्टी येथील भगवान बाबा नगर येथे नातेवाईक असल्याने येथील गावकऱ्यांनी हिंदवी हिला मंगळवारी भगवान बाबा नगर येथे बोलावले होते त्या ठिकाणी तिने आपली कला सादर केल्याने कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सद्स्य गावकरी यांनी तिला आष्टी येथे बुधवारी बोलावले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात या चिमुरड्या मुलीने अक्षरशः कुठल्याही योगासने करणाऱ्या भल्या भल्याना हेवा वाटेल असे रबरापेक्षा ही लवचिक आशा प्रकारचे शरीर हलवत योगाचे थक्क करणारे योगाचे अनेक प्रात्यक्षिक सादर केले या मुळे आष्टीकर मंत्रमुग्ध झाले पंधरा मिनिटात तिच्यावर अक्षरशः बक्षिसांची लयलूट झाली अवघे नऊ वर्ष वय असलेल्या हिंदवी ही वयाच्या चौथ्या वर्षांपासून योगासने करीत असून चौथ्या वर्षी तिच्या हाताचे सांधे निसटली होते. त्यावेळी डॉक्टराणी व्यायाम करण्यास सांगितले होते तेंव्हा पासून तिला योगासने करण्याचा छंद लागलेला असून ती जवळपास योगासनांची ४०० प्रकार करते तसेच दिवसभरात तीन तास व्यायाम करते तिने म्हैसूर येथील तीन महिने योगाचे प्रशिक्षण घेतलेले आहे तिला खूप मोठे करण्याची इच्छा आहे मात्र परिस्थिती नसल्याने शासनाने मदत करावी असे तिचे वडील परमेश्वर यांनी सांगितले
आष्टी येथे झालेल्या कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद थोरात माजी सरपंच भागवत कडपे काँग्रेस चे जिल्हा सचिव राहेमत पठाण ग्रामसेवक एन बी काळे ग्रा प सदस्य मधुकर मोरे, नसरुल्लाह काकड ,राजू आघाव, बाबासाहेब बागल,भगवान कांबळे, सत्तार कुरेशी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण टेकाळे, माऊली चौरे दादाराव चौरे ,परमेश्वर चौरे,आदींची उपस्थिती होती

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button