बीडबीड जिल्हा

खंडेश्वरी मंदिर ते पिंपळनेर रस्त्याचे काम तात्काळ सूरु करा

सर्व गावच्या जागरूक युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासह दिला मणक्याचा बेल्ट भेट

बीड) गेल्या काही महिन्यांपासून खंडेश्वरी मंदिर ते पिंपळनेर व्हाया सुर्डी पर्यंत खड्डेमय रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मणके मोडण्याचे काम होत आहे. ना लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत आहेत ना प्रशासन. काही दिवसांपासून खांडे पारगाव, म्हाळसापूर, पिंपळगाव, जवळा, नागापूर,उमरद, पिंपळनेर, इट, बेलवाडी, बाभळवाडी, बऱ्हाणपूर, सुर्डी, नाथापूर, आडगाव, गुंधा, वडगाव आदी ठिकाणच्या लोकांना बीडला येताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या खड्डेमय रस्त्यामुळे शारीरिक, मानसिक पर्यायाने आर्थिक त्रास होत असल्याचे निवेदनासह मणक्याला त्रास होऊ नये यासाठी असणारा बेल्ट भेट देऊन युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यापूर्वी राजेंद्र आमटे व राहुल टेकाळे यांनी आंदोलन करून या रस्ताचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र तात्पुरते काम सुरू करून पून्हा बंद करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे धनंजय गुंदेकर, राजेंद्र आमटे, राहुल टेकाळे, गणेश खांडे, महादेव आमटे, नितीन आमटे, शुभम खांडे, संग्राम धनवे, अविनाश पाटोळे, नितीन खांडे, शंभू खांडे, केशव खांडे, आकाश ढेपे आदींची यावेळी उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button