गेवराईबीड जिल्हा

गेवराई राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आणि शहर आघाडीच्या नुतन पदाधिकार्यांना अमरसिंह पंडित यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

गेवराई, ) ः- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार तळागाळातील व्यक्तिंपर्यंत पोहोचवून संघटना मजबुत करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी परिश्रम घेण्याचे आवाहन माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केले, त्यांच्याहस्ते गेवराई तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि शहर आघाडीच्या नुतन पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते.

गेवराई तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकारीणी व शहर कार्यकारीणीची निवड करून माजी आ.अमरसिंह पंडित यांच्याहस्ते नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगनपाटील काळे, उपसभापती शाम मुळे, राष्ट्रवादी विद्याथ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, दत्ता दाभाडे, व्यापारी सेलचे शांतीलाल पिसाळ, वशिष्ट शिंदे, भाऊसाहेब माखले, संदीप मडके, सय्यद आलीम, अमित वैद्य, जयसिंग माने, भागवत दहिवाळ, संग्राम पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत विद्यार्थी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी उदय पानखडे, कृष्णा जाधव, तालुका सरचिटणीसपदी बळीराज शेळके, अविनाश इंदे, तालुका चिटणीसपदी अजय धस, अजय आहेर, तालुका कोषाध्यक्षपदी विशाल व्हनमाने तर तालुका संघटक पदी पृथ्वीराज आर्दड आणि कैलास मदने यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी शेख मोहसीन, शहर उपाध्यक्षपदी वैभव दाभाडे, कृष्ण गळगुंडे, शहर चिटणीसपदी अभिषेक फुलारे, लखन पंडित, शहर कोषाध्यक्ष पदी राहुल वादे, शहर संघटक पदी शेख मोबीन यांची निवड करून यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button