बीडबीड जिल्हा

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यात विविध विषयांवर चर्चा

डॉ.योगेश क्षीरसागर यांना युवा सेनेची महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता !

बीड, बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात युवा सेना संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यानिमित्त युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव मा. वरुण सरदेसाई आले होते.यावेळी शासकीय विश्रामगृह बीड येथे शिवसेनेचे युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी वरुण सरदेसाई आणि डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.याप्रसंगी डॉ.क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील अनेक प्रश्नांवर चर्चा करत नगर पालिकेच्या माध्यमातून आणि ग्रामीण भागातील विविध विकासकामांसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आले असून मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्यामाध्यमातून बीड मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली.

शिवसेनेचे युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांना युवा सेनेची महत्वाची जबाबदारी मिळणार?

युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या चर्चे दरम्यान योगेश क्षीरसागर युवा मंचच्या वतीने वरुण सरदेसाई यांचा सत्कार करण्यासाठी आले असता सरदेसाई यांनी डॉ.क्षीरसागर यांना आपण सुशिक्षित आहात, डॉक्टर आहात, मोठ्या प्रमाणात युवा कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण देखील इमाने इतबारे काम करता परंतु पदाधिकारी म्हणून काम करत नाहीत. त्यामुळे युवा सेनेच्या माध्यमातून आपण युवा सेनेच्या महत्वाच्या पदावर काम करावे व येणाऱ्या काळात युवा सेनेची महत्वाची जबाबदारी आपल्याला सोपवली जाईल त्यासाठी आपण तयार रहावे असे सांगितल्यामुळे भविष्यात डॉ.योगेश क्षीरसागर सारखा सुशिक्षित आणि सुसंस्कृत तसेच शहरी व ग्रामीण भागातील तरुणांना सोबत घेऊन कार्य करणाऱ्या युवा नेत्यावर युवासेनेच्या महत्वाच्या पदाची माळ गळ्यात पडण्याची शक्यता आहे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button