जालनामराठवाडा

लोकसहभागातून संकलीत केलेला 56 हजार रूपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात जमा

आष्टी ) गेल्या काही दिवसापूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात अतिवृष्टी व महापुराने झालेले अतोनात नुकसान लक्षात घेऊन पुरग्रस्ताच्या मदतीसाठी आष्टी ता परतूर येथे सर्व पक्षीय सर्व समाजाच्या नागरिकांच्या वतीने मदत फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या मदतफेरीला आष्टी येथील नागरिक आणि व्यापारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 56350 रूपयांचा मदतनिधी जमा केला.या वेळी पंचायत समिती उपसभापती रामप्रसाद थोरात,काँग्रेस जिल्हा सचिव रहेमतखान पठाण,माजी सरपंच भागवत कडपे, राष्ट्रवादी युवक जिल्हा सचिव मोहन बाण,राजेभाऊ आघाव,बाबासाहेब बागल,सत्तार कुरेशी, रोहन वाघमारे, बाबू गोसावी,सह ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी,यांच्या उपस्थितीत हा मदत निधी संकलित करण्यात आला तो मदत निधी नुकताच उपजिल्हाधिकारी केशव नेटके,यांच्या कडे 56350 रुपयांचा मदत निधी चा डीडी स्वरूपात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात जमा करण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button