बीडबीड जिल्हा

पालकमंत्र्यांसमोरील 15 ऑगस्ट रोजी नियोजित निराधारांचे आक्रोश आंदोलन तात्पुरते स्थगित — रमेश पोकळे

बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वर्ग करण्याच्या मागणीला यश

बीड  :- बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेतील सन 2019 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना थकीत अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ वर्ग करावे अन्यथा पालकमंत्र्यांसमोर 15 ऑगस्ट रोजी निराधारांचे आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे यांनी निवेदनाद्वारे दिला होता.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना या योजनेतून सन 2019 मध्ये मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मागील दोन वर्षापासून अर्थसाह्य वितरित केलेले नव्हते तेव्हा तालुक्यातील लाभार्थ्यांना थकीत अर्थसहाय्य मंजूर करण्याकरिता तातडीने कार्यवाही करावी अन्यथा 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्री यांच्यासमोर निराधारांचे आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा बीडचे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी दिनांक 5 ऑगस्ट 2019 रोजी निवेदनाद्वारे दिला होता.

यावर तालुका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत लाभार्थ्यांना अनुदान वर्ग करण्यासंदर्भात व आंदोलन मागे घेण्याची विनंतीपत्र तहसीलदार यांच्याकडून देण्यात आल्यामुळे किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी आज फेसबुक लाईव्ह द्वारे संवाद कार्यक्रमांमध्ये निराधारांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र यापुढे बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ अर्थसहाय्य योजना, दिव्यांग, रेशन,पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकरी यांच्यासह विविध प्रश्नावर येणाऱ्या काळात अटल जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील गावोगावी जाऊन अभियानाद्वारे सर्वांशी संवाद साधून विविध प्रश्न प्रशासनासमोर आणून मार्गी लावण्यासाठी व्यापक कार्य करणार असल्याचे व वेळ प्रसंगी आंदोलन करणार असल्याचेही भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रमेश पोकळे यांनी फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाद्वारे स्पष्ट केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button