बीडबीड जिल्हा

आ.संदिप क्षीरसागरांनी आढावा बैठकीत मांडले बीड मतदार संघातील अनेक मुद्दे

पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून कार्यवाहीचे निर्देश; कोव्हिड,पीक विमा,पीक कर्ज आदींचा समावेश

बीड ):- कोरोना विषाणू कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी व पीक विमा, पीक कर्ज व इतर विषयांबाबत सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील कोव्हिड, पीक विमा, पीक कर्ज, महावितरण बाबत अनेक मुद्दे उपस्थित केल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.
शुक्रवार दि.13 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला नुतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक आर.राजा स्वामी, आ.प्रकाश सोळंके, आ.बाळासाहेब आजबे, आ.संजय दौंड, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह कृषी, महावितरण, आरोग्य विभागातील अधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना आ.संदिप क्षीरसागर म्हणाले की, मागील आढावा बैठकीत ग्रामीण आरोग्य केंद्रात ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित करण्याबाबत मागणी केली होती. त्यातील नेकनूर, चर्‍हाटा, चौसाळा, रायमोहा येथे ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू करण्यात आले. ही कामे तातडीने पुर्ण करून याठिकाणी कोव्हिड बाबतीत रूग्णांना उपचार मिळावेत अशी मागणी केली. यावर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकार्‍यांना सूचना देत तात्काळ तीनही ठिकाणचे ऑक्सिजन प्लांट कार्यन्वित कोव्हिड रूग्णांचा उपचार देण्यात  यावेत. तसेच ग्रामीण भागातील महत्त्वाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट तयार करून तिसरी रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे निर्देश दिले. बीड शहरातील महावितरणचे पोल कुजलेल्या अवस्थेत आहे तर काही ठिकाणी वाकलेले आहेत, तारा तुटलेल्या आहेत. ग्रामीण कृषी पंपांना वेळेवर वीज मिळत नाही. याबाबत महावितरणने गांभीर्याने घेवून तातडीने उपाय योजना कराव्यात शेतकर्‍यांनी पीक विमा भरला परंतू कृषी विभाग, विमा कंपन्या यांच्यातील समन्वय नसल्याने अनेक शेतकरी पीक विम्यपासून वंचित राहत आहेत. याबाबत अनेक शिष्ट मंडळांशी याबाबत चर्चा केली, पीक विम्या बाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत, शासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍यांना पीक विमा द्यावा अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी केल्यानंतर याबाबत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाचे अधिकारी, पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांची एकत्र बैठक लावून यांची एकत्र बैठक लावून बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी आपण प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. आ.संदिप क्षीरसागर यांनी खटकीघाट येथील ग्रामस्थांच्या गाव पुर्नवसनाबाबत प्रश्‍न उपस्थित करत खडकीघाट येथील ग्रामस्थांना शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या सर्व सुविधा मिळणे गरजेच्या आहेत. वीज कनेक्शनसाठी येथील ग्रामस्थांना कबाले दिले जात नाहीत ते तात्काळ देण्यात यावेत अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी केल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या आढावा बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button