बीडबीड जिल्हा

उद्यापासून लॉकडाऊन मध्ये शिथिलता, सर्व दुकाने दहा वाजेपर्यंत चालू ठेवता येणार

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी काढले काढले नवीन आदेश.

बीडः राज्य सरकारने दिलेल्या नविन आदेशा नुसार आता बीड जिल्हयाचे ही कुलूप उघडले आहे. 15 आॕगस्ट पासून बीड जिल्ह्यातील सर्व व्यवहार पुर्णवेळ सुरु राहणार असुन हाँटेल, उपहारगृह देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
चार दिवसा पुर्वी राज्य सरकारने ब्रेक द चैन अंतर्गत राज्यातील सर्व व्यवहार सुरळित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखिल सुधारित आदेश काढले असून,
सर्व प्रकारची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत उघडता येणार आहेत. तर उपहारगृह ५०% क्षमतेने पुर्णवेळ सुरु ठेवता येणार आहेत. दिडवर्षापुर्वी पहिल्यांदा लाँकडाऊन सुरु झाले होते त्यानंतर व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मर्यादित वेळ देण्यात येत होती. आता मात्र पुर्णवेळ व्यवसाय सुरु करता येणार आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी हे आदेश काढले आहेत.

 

लसिकरण आवश्यक
प्रशासनाने सर्व व्यवसाय पुर्णवेळ सुरु ठेवायला परवानगी दिली असली तरी दुकाने, हाँटेल यासाठी तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पुर्ण झालेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button