गेवराईबीड जिल्हा

कार्यकर्त्यांच्या ईनकमिंगमुळे राष्ट्रवादीत चैतन्य

भाजपा-सेनेचे शेकडो कार्यकर्ते अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत दाखल

गेवराई ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश करत असून कार्यकर्त्यांच्या ईनकमिंगमुळे राष्ट्रवादीत चैतन्य आले आहे.

गेवराई तालुक्यातील मौजे लोणाळा येथील भाजप-सेनेचे सक्रिय कार्यकर्ते हनुमान शिर्के यांच्यासह संपत भोसले, रामचंद्र मुळे, रघुनाथ मुळे, विजयकुमार शिर्के, सदाशिव मुळे, विठ्ठल मुळे, गणेश भोसले, नारायण मुळे, नाना बोडखे, जगन गरड, दिनकर मुळे आदींनी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जि. प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्य दिनांक १६ ऑगष्ट रोजी कृष्णाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे उप सभापती श्यामराव मुळे,किशोर कांडेकर, सरपंच गणेश राठोड, रवी शिर्के, कल्याण शिर्के, सरपंच मोहन कुटे, नारायण डरफे, पंढरीनाथ शिर्के, श्यामराव पवार, सुभाष पवार, अनिल मुळे, मोहन शिर्के यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मौजे बेलगाव येथील शिवसेनेचे माजी सरपंच तथा सक्रिय कार्यकर्ते संदिपान आप्पा पट्टे यांच्यासह वैजिनाथ राऊत, विजय पट्टे, उद्धव पट्टे, विनोद खरात, बाबुराव राऊत, धर्मराज पट्टे, भुजंग सूर्यवंशी, सतिष राऊत, अमोल राऊत, सुरेश राऊत, विष्णू पट्टे, कुंडलिक टेकाळे आदींनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृष्णाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सोपान टेकाळे, तात्यासाहेब चाळक, बंडू महाराज राऊत, बप्पा महाराज राऊत, सुरेश ढवारे, विठ्ठलराव राऊत, आसाराम बेदरे, रुस्तुम बेदरे, भास्कर नाना राऊत, दादाभाऊ सकार्डे, कृष्णा राऊत, संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मौजे खेर्डांवाडी येथील भाजपचे माजी ग्रा.सदस्य गोविंद साबळे आणि मारफळा येथील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते अशोक गोपणे यांनी अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कृष्णाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी मेघराज कादे, मारोती भिसे, रामेश्वर वाघमोडे, बाळासाहेब साळवे, मोहन कुटे, नारायण डरफे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button