बीडबीड जिल्हा

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन संपन्न.

बीड | आज जंतर-मंतर नवी दिल्ली येथे मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आले. यावेळी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची मागणी करण्यात आली आहे.

एक मराठा, लाख मराठा च्या घोषणाने दिल्ली पुन्हा एकदा दणाणली. १४ सप्टेंबर २०२० ला सुध्दा राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.
१५ ऑगस्ट रोजी हे आंदोलन करण्यात येणार होते परंतु १५ आणि १६ ऑगस्ट ला परवानगी देण्यात आली नव्हती यामुळे दोन दिवसानंतर हे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान कोविडमुळे केवळ ५ लोकांनाच आंदोलन स्थळी परवानगी देण्यात आली होती.
यावेळी ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची मागणी करण्यात आली तसेच तात्काळ राज्य आणि केंद्र सरकारने समन्वयातुन आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा, येत्या हिवाळी अधिवेशनात संसदेत कायदा करावा तसेच राज्यातही मराठा आरक्षाचा कायदा करण्याची मागणी करण्यात आली.

पवार साहेबांनी संभाजीराजे छत्रपतींना सोबत घेऊन मोदींकडे जावे-नरेंद्र मोदी.
आंदोलना दरम्यान राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे यांनी पवार साहेबांनी संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेऊन दिल्लीत मोदींकडे जावे आणि मराठा आरक्षणासाठी काम करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. पवार साहेब आणि मोदींचं नातं गुरू शिष्याचं असुन पवार साहेबांनी संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेऊन मोदींकडे जावे आणि मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करून तात्काळ आरक्षण मिळवुन द्यावे अशी मागणी गंगाधर काळकुटे यांनी केली आहे.

आंदोलनकर्त्यांना दिल्लीत अटक.

आज दि‌.१७ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ०१:३० वाजता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे दिल्ली येथे जंतर-मंतर वर आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय छावा संघटना संस्थापक अध्यक्ष गंगाधर नाना काळकुटे, युवा अध्यक्ष अशोक काळकुटे, राजेंद्र वाघ आणि शेकडो कार्यकर्ते राज्यातुन १५ ऑगस्ट रोजी दिल्लीत दाखल झाले होते. परंतु १५ आणि १६ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या अनुषंगाने आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतर आज या आंदोलनाला केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आली. हे आंदोलन सुरू असताना आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जंतर-मंतर येथुन अटक केली होती. दोन तासानंतर पोलिसांनी नजरकैदेतुन आंदोलकांना सोडले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button