बीडबीड जिल्हा

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या लंडनच्या पुरस्काराने अँड. अजित देशमुख यांच्या कोरोना काळातील मेहनतीची घेतली दखल

कोविड सेंटरच्या भेटी पोहोचल्या जगभरात,- सत्कार घेणार नाही

बीड  ) कोरोनाच्या काळात लोक घाबरून घरात बसले होते. त्या वेळी एक नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी अँड. अजित देशमुख यांनी एप्रिल, मे व जून २०२१ या काळात एकशे तेरा कोरोना केअर सेंटर आणि दवाखान्यांना भेटी दिल्या होत्या. आज “सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट” या पुरस्काराचे वितरण जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनचे राष्ट्रीय सचिव डॉ. दिपक हारके यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे करण्यात आले.

सहा हजार शंभर पेक्षा जास्त रुग्णांशी आणि त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून अँड. देशमुख यांनी या काळात सहा हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास केला. यासाठी स्वतःच्या खिशातून तिस हजार रुपयांपेक्षा डिझेल साठी खर्च केला होता. विशेष म्हणजे हे सगळं काम जीव धोक्यात घालून चालु होतं.

देशमुख यांच्या या दौऱ्यात अनेक अधिकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला होता. देशमुख यांनी प्रत्येक कोरोना केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले नोडल ऑफिसर, डॉक्टर, नर्स, कंपाउंडर यांचेसह तेथील रुग्णांशी थेट संवाद साधला होता. त्यामुळे तिथल्या स्थानिक अडचणी दूर होण्यास देखील मोठ्या प्रमाणात मदत झाली होती. दोषींवर कारवाई करण्याची आपली नेहमीची भूमिका बाजूला ठेवून, तक्रारी करून चौकशी लावण्यापेक्षा, आहेत त्या चुका सुधारून रुग्णांना तात्काळ चांगली सेवा मिळवुन देण्याच्या उद्देशाने देशमुख यांनी यावेळी काम केले.

जनतेच्या मनातील कोरोनाची भीती कमी करून त्यांना धीर देण्याचं मोठं काम या माध्यमातून झालं होतं. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक देखील अँड. देशमुख यांच्या कामाने भारावून जात होते. कोरोना नसलेला, लोक प्रतिनिधी अथवा शासन सेवेत नसलेला एक व्यक्ती कायम रुग्णां सोबत राहून त्यांना धिर देत असल्याचे पाहून अनेक रुग्णांच्या मनातील भीती पळून जात होती.

जवळपास सर्वच कोरोना केअर सेंटर चालकांनी त्यांचे काम चोखपणे बजावले. त्यामुळे लोकांचे पैसे वाचले. सर्वच सेंटर चालक देखील देशमुख यांच्या येण्याचे मनातून स्वागत करायचे. कोणीतरी आपलं काम प्रत्यक्ष सेंटरमध्ये सर्वत्र फिरून पाहतोय, याचा त्यांनाही आनंद वाटायचा. तेथील रुग्णांना काही कमी आहे का ? याची चाचपणी देशमुख यांनी केली होती. एकशे पंचवीस कोरोना केअर सेंटर मधील सहा हजारावर रुग्णांशी संपर्क करून देशमुख यांना कोरोनाची बाधा झाली नाही, हे विशेष.

बीड शहरात लोक सहभागातून चालणारे एक सुंदर असं रुग्णांना चांगली सेवा देणारं कोविड सेंटर मित्र मंडळी सोबत घेऊन उभारण्याचा आपला प्रयत्न होता. मात्र काही कारणाने हा मुद्दा बाजूला गेला. त्यामुळेच मला जिल्हाभरात सर्व कोविड सेंटरला भेटी देता आल्या. एका सेंटरमध्ये अडकून पडण्यापेक्षा ही सेवा मोठी ठरल्याचं अँड. अजित देशमुख यांनी म्हंटल आहे. वितरण प्रसंगी जयसिंग मापारी, दत्ता आवारी, गोवर्धन मस्के, संजय पठाडे, शिवाजी खेडकर, शेख अन्सार, शाम पठाडे हे हजर होते. तर कोरोनाच्या या काळात सत्कार स्विकारुन कार्यकर्त्याला हजार पाचशे रुपयांना टाकणे योग्य नसल्याने आपण सत्कार स्विकारणार नाही, असेही अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.

“कोरोना महामारीने कहर केला होता. जिल्ह्यात रोज दिड हजारच्या आसपास रुग्ण निघायचे. त्या वेळी रुग्णांमध्ये मिसळुन काम करणं सोपं नव्हतं. माझे अनेक हितचिंतक जाऊ नको म्हणून सांगायचे. पण माझ्या आजवरच्या कार्यपद्धतीनं मला थांबु दिलं नाही. तुम्ही फिरायलाचं पाहिजे, असं सांगणारे मोठे अधिकारी माझ्यासोबत होते. मोठ-मोठे लोक कोरोनाने गेल्यानंतर कधी कधी मनात भीती निर्माण व्हायची. पण घरच्यांच्या पाठबळावर मला हे करता आलं. या सर्वांमुळे माझं कामं जगात पोहोचले. या काळात आरोग्य खात्याचे अधिकारी कोविड वॉर्डात किती मेहनत घेत आहेत, हे मी प्रत्यक्ष पहायचो, तेव्हा त्यांनाही आधार वाटायचं. आरोग्य खात्याचे सर्व अधिकारी, कोविड सेंटरचे सर्व नोडल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी, सर्व स्टाफ, सर्व कोविड सेंटर चालक आणि माझे कुटुंबीय यांचा मी ऋणी आहे.”
– अँड. अजित देशमुख.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button