बीडबीड जिल्हा

नगरपरिषद, नगरपंचायतच्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करू – आ सुरेश धस

प्राधिकारी उस्मानाबाद, बीड, लातूर मतदार संघात आ सुरेश धस यांचा आढावा बैठक दौरा ...!

बीड ) भाजपचे आ सुरेश धस यांनी आपल्या प्राधिकारी उस्मानाबाद, बीड, लातूर दौऱ्याची सुरूवात केली असून उस्मानाबाद जिल्ह्यानंतर काल बीड जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत बैठकांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तुळजाभवानी आईचे आशीर्वाद घेऊन हा दौरा सुरू करण्यात आलेला होता. आज लातूर जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे.

तुळजापूर, उस्मानाबाद, भूम, वाशी, परांडा, कळंब आदि ठिकाणच्या तसेच बीड जिल्ह्यातील बीड, वडवणी, माजलगाव, धारूर, अंबाजोगाई सह इतर नगरपरिषद, नगरपंचायतीला भेटी देऊन आ सुरेश धस यांनी नगरपरिषद/नगरपंचायत अंतर्गत विकास कामाबाबतच्या विविध महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करून समस्या जाणून घेतल्या. नगरपरिषद/नगरपंचायत अंतर्गत घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, प्रशस्त रस्ते, भुयारी ड्रेनेज, रो.ह.यो. योजना,वृक्षारोपण व शहर सुशोभिकरण, विद्युत सोलर प्लॅन्ट व्यवस्था व वितरण इत्यादी महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले.

भेटी दरम्यान आ सुरेश धस यांनी कोरोना उपचारास आवश्यक असलेले ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट दिले. या बैठकादरम्यान सर्व नगरपरिषद/नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 

आज लातूर जिल्ह्यात, परवा उस्मानाबाद जिल्हा दौरा संपन्न, काल बीड जिल्ह्याच्या नगरपरिषद/नगरपंचायत बैठका घेतल्या..!

प्राधिकारी उस्मानाबाद, बीड, लातूर मतदारसंघ दौऱ्यामध्ये आतापर्यंत उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतला आ सुरेश अण्णा धस यांनी आढावा बैठका घेतल्या असून आज दि 20 रोजी लातूर महानगरपालिका सह जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतमध्ये आढावा बैठका घेण्यात येणार आहेत.

 

विविध विकासकामे, समस्यांच्या आढाव्यासह ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत भेटीदरम्यान नगरविकासच्या विविध विकासकामे, समस्यांच्या आढाव्यासह कोरोनाच्या उपचारात उपयुक्त ठरणारे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट स्वरूपात संबंधित नगरपरिषद, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधीकडे आ सुरेश अण्णा धस यांच्या वतीने देण्यात येत आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button