बीडबीड जिल्हा

नगराध्यक्षांनी दिली महिला बचत गटातील महिलांसाठी रक्षाबंधनाची खास भेट

नगराध्यक्षांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर सभागृह येथे गाळे कामाचे भूमिपूजन संपन्न

बीड )बीड शहरातील भाजी मंडईतील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे महिला बचत गट मॉल येथे महिलांना रोजगारासाठी गाळे उभारण्यात येणार असून नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते गाळे कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

महिला बचत गटातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शहरातील भाजी मंडईतील अहिल्याबाई होळकर सभागृह येथे महिला बचत गट मॉल येथे गाळे उभारण्यात येणार आहेत.जेणेकरून महिलांना रोजगाराच्या माध्यमातून स्वतः च्या पायावर उभे राहून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. बीड नगर पालिकेच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी कायमस्वरूपी स्टॉल उभारण्यात येणार असून कमीत कमी दरांमध्ये हे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

यावेळी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले की, गोर गरीब लोकांचे आशीर्वाद माझ्यावर कायम असतात म्हणून मी गरीबांसाठी काम करत आलो आहे. माझे खूप मोठं भाग्य आहे ज्यामुळे मला इतक्या मोठ्या बहिणी आहेत. माझ्या या महिला बचत गटातील बहिणींसाठी भावाकडून रक्षाबंधन दिनानिमित्त ही छोटीशी भेट असून ही भेट देऊ शकलो हे माझे भाग्यच समजतो.यावेळी नगराध्यक्षांनी महिलांना रोजगारासंबंधी मार्गदर्शन करतांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाच्या उत्पादनाची निर्मित करावी जेणेकरून माराठवड्याच्या बाहेर ग्राहकांसाठी निर्यात करता येईल.महाराष्ट्रातील महिला बचत गटाचा पहिला मॉल आपण बीड शहरात सुरू केला. आर्थिकदृष्टया, गोर गरीब महिलांना रोजगारासाठी कमी दरात गाळे दिले जाणार आहेत.यावेळी नगराध्यक्षांनी महिला बचत गटातील सर्व महिलांना गरज भासेल तेव्हा या भावाला हाक मारा बहिणीसाठी धाऊन येईल असे सांगितले. यावेळी बचत गटातील महिलांनी नगराध्यक्षांना राख्या बांधल्या. नगराध्यक्षांनी याप्रसंगी सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालिनी परदेसी, सूत्रसंचालन ललिता तांबारे तर आभार प्रदर्शन राजू वंजारे यांनी केले.याप्रसंगी
डॉ.इलियास खान, हमीद चाऊस, ईश्वर धनवे, शारेख जकेरीया, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ यांच्यासह शेख आयेशा, नीता मॅडम, सुदेशना सरवदे, महमुदा शेख, कविता डोईफोडे, प्रिया बनसोडे, कल्पना सोनवणे, सीमा उडान, संगिता सांगोळे यांच्यासह महिला बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

महिलांनी नगराध्यक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले

महिला बचत गटातील महिलांनी गाळे भूमिपूजनप्रसंगी नगराध्यक्षांना राखी बांधली.
बचत गटातील महिलांनी नगराध्यक्ष साहेब आमच्या सोबत आहेत हे आमचे भाग्य असून आयुष्यभर ऋणी राहू. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आमच्या भावाने मार्केट च्या मुख्य ठिकाणी मॉल च्या रुपात शिदोरी दिल्याचं सांगत रक्षाबंधन साजरे केले.
रक्षाबंधनानिर्मित आत्तापर्यंतची सर्वात मोठी भेट असल्याचे देखील सांगितले. सर्व महिलांनी पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्षांचे आभार मानले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button