पाटोदाबीड जिल्हा

आ. सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली कुसळंब येथे ”वेध भविष्याचा करिअर मंत्र” उपक्रमाचे आयोजन

दहावी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार अनुभवींचे मार्गदर्शन, कोविड योध्यांचा होणार सन्मान

  • विद्यार्थ्यांनी पालकांसह उपस्थित राहावे – जि.प. सदस्य माउली अप्पा जरांगे

पाटोदा ) :- गेल्या काही वर्षांपासून कुसळंब येथे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन लाभावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य माउली अप्पा जरांगे हे आ सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली “वेध भविष्याचा करियर मंत्र” या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करत असतात. यावर्षी देखील या उपक्रमाचे आयोजन आ सुरेश अण्णा धस मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना अनुभवी शैक्षणिक तज्ज्ञ, व्याख्याते, प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार असून कोविडयोध्यांचा सन्मान देखील केला जाणार असल्याचे जिप सदस्य माउली अप्पा जरांगे यांनी म्हंटले आहे. कुसळंब ता पाटोदा येथे या मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन सोमवार दि २३/०८/२०२१ रोजी सकाळी १०:१५ वाजता करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ सुरेश धस हे असणार आहेत.

डॉ एस एस सोनवणे (संचालक गरुडझेप करिअर अकॅडमी, औरंगाबाद), वसंतराव हंकारे (प्रसिद्ध व्याख्याते, सांगली), नीता अंधारे (चीफ ऑफिसर, बीड), अमोल ताकभाते(बीडीओ, पंस निलंगा, जि लातूर) यांचे मार्गदर्शन या उपक्रमात लाभणार आहे. या उपक्रमासह कोविड योध्यांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनपर उपक्रमाचा लाभ विद्यार्थी व पालकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य माउली अप्पा जरांगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button