गेवराईबीड जिल्हा

महागाई व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ गेवराईत राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अंदोलन

मोदी सरकार विरोधात दिल्या घोषणा

गेवराई ) केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गँसच्या किंमतीमध्ये प्रंचड वाढ करुन महागाई वाढवली आहे. महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून मोदी सरकारचा निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीने गेवराई शहरात तिव्र अंदोलन करुन तहसिलदार यांना निवेदन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती शाहीन भाभी पठाण, शहराध्यक्ष सौ. मुक्ता आर्दड- मोटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

भाजपच्या मोदी सरकारने इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्यांचे व महिला, गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कोरोना महामारीमध्ये सर्वसामान्य जनतेला आधार देण्या ऐवजी जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर दरवाढ केल्यामुळे जनतेमध्ये केंद्र सरकार विरोधात मोठा आक्रोश निर्माण झाला आहे. शनिवार दिनांक २१ ऑगष्ट रोजी गेवराई येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडी कडून केंद्र सरकारचा जाहीर निषेध केले. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रभारी तहसीलदार श्री रामदासी यांना निवेदन दिले

यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष श्रीमती शाहीन भाभी पठाण, शहराध्यक्षा सौ. मुक्ता आर्दड, सौ. पल्लवी गोगुले, सौ. किरण दाभाडे, सौ. योगिता तांबारे, सौ. जयश्री दाभाडे, सौ. शिला पैठणे, सौ. सिमा जवंजाळ, सौ. विमल दाभाडे, सौ. सुनिता दाभाडे, सौ. गौरी दाभाडे, सौ. जनाबाई कांबळे, श्रीमती समाबाई, कांबळे, श्रीमती सुलताना शेख, श्रीमती फिरदोस फारोकी आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button