गेवराईबीड जिल्हा

धोंडराई माध्यमिक विद्यालयात शालेय साहित्याचे वाटप

गेवराई: धोंडराई येथील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्यामध्ये शालेय गणवेश, स्कुल बॅग, पाण्याची बाॅटल, मास्क, सॅनिटायझर इत्यादींंचा समावेश आहे. या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अमरसिंहजी पंडित, सचिव जयसिंहजी पंडित, विजयसिंह पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद गोरकर, अमृत डावकर यांनी कौतुक केले तसेच पालकांनी शाळेचे आभार व्यक्त केले.
जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, धोंडराई येथे रविवार दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक भक्तराज पौळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. ध्वजारोहणानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक भक्तराज पौळ तर प्रमुख पाहुणे म्हणून मच्छिंद्रनाना खरात, भरतराव खरात, नारायण नवले, भास्करराव खरात, रामराव काकडे, अशोक वंजारे, पोपटसिंग राजपूत, अशोक नरोटे, किरण खरात, भागवतराव ढेंबरे, रमेशराव रावडे, शिवाजी मेघारे, सचिन खरात, हरिभाऊ राठोड, हिम्मतराव खरात, भीमराव प्रधान, तलाठी राठोड, प्रकाश खरात, लहू चव्हाण ,गायकवाड, शहाणे ,खरात सह आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास सामाजिक अंतराचे पालन करुन पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button