बीडबीड जिल्हा

आमदार सुरेश धस यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट.

"आगामी गळीत हंगामात मजुरांच्या सुविधांबाबत केली चर्चा."

बीड), बीड लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश आण्णा धस यांनी काल पुणे येथील साखर संकुलात, साखर आयुक्त शेखरजी गायकवाड यांची भेट घेऊन ऊसतोड कामगारांच्या विविध मुद्यावर सविस्तर चर्चा केली.

या वेळी राज्य सरकार, कारखानदार व साखर संघ, गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार यांना कोण-कोणत्या सामाजिक सुरक्षा व अयोग्य सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहेत, ऊसतोड कामगारांच्या कल्याणकारी महामंडळाचे अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल व अंमलबजावणी सुरू नाही, राज्य सरकार तीन महिन्यांत ऊसतोड मजुरांचा कायदा करणार होते ते अजून जैसे थे आहे, कायद्याची घोषणा होऊन विधिमंडळाची तीन अधिवेशने झाली पण अद्याप कायदा होऊ शकला नाही.
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्यासाठी मा.उपसभापती निलमताई गोऱ्हे समिती अंमलबजावणी आरोग्य प्रशासन यांच्याकडून अद्याप होताना दिसत नाही, गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखाना स्थळावर (स्थानिक ठिकाणी) महिलांसाठी आयुर्मंगलम योजनेचा नव्याने प्रारंभ करून त्यांना आरोग्य कवच देण्यात यावे, ऊसतोडणी कामगारांची सरकार सत्तेत येऊन तीन वर्ष होत आले, पण अद्याप ऊसतोडणी मजुरांची नोंदणी व आकडेवारी संकलित करण्यासाठी इतकी दिरंगाई का..? अशा अनेक समस्या मुद्यांवर सविस्तर चर्चा केली.

तसेच ऊसतोडणी कामगारांना ऊसभरणी करताना जी कसरत करावी लागते ती कमी होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील अभियंता सनी काळभोर याने ऊस वाहतूक व भरण्यासाठी एक मशिन बनवली आहे,जी मशिन जवळपास १०० फुटावरून ऊसाची मोळी वाहून ट्रॅक्टर, ट्रक,छकडा गाडी यामध्ये सहजासहजी कमी वेळेत,कमी कमी कष्टाने गाडी भरण्यासाठी मदत होते, त्यामुळे महिलांचे गर्भपात, मणक्याचे आजार,हात पायाला इजा होणे इत्यादी धोक्याच्या गोष्टीपासुन ऊसतोड मजुरांना मोकळा श्वास मिळू शकतो, ही मशीन वाहतूकदार ग्रुप मध्ये खरेदी करू शकतो, परंतु अद्याप ह्या मशीनचे पेटंट (अधिकृत नोंदणी) न झाल्याने ते उपयोगात आणता येणार नाही त्यामुळे आपण प्रत्यक्ष काळभोर यांने बनवलेल्या मशिनची पाहणी करून भेट द्यावी व त्यांना अधिकृत नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती केली.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button