बीडबीड जिल्हा

जिओ जिंदगीच्या प्रयत्नांमुळे समतानगर मधून कोरोना हद्दपार

आज कोरोना लसीकरणाचे आयोजन - धनंजय गुंदेकर

बीड – तालुक्यातील आंबेसावळी, समतानगर येथे कोरोना, न्यूमोनिया मुळे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. जिओ जिंदगी अभियानाकडून आरोग्य शिबीर, मार्गदर्शन शिबिर, अँटीजन, आर टी पी सी आर कॅम्प घेण्यात आला. याकामी ताडसोना आरोग्य केंद्राचे प्रीतम लोध, नारायण पैठणे, बरडे, कापसे यांचे सहकार्य लाभले होते.

आरोग्य शिबिरात जवळपास 200 व अँटीजन कॅम्प मध्ये 134 ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. सर्वच्या सर्व अँटीजन व आर टी पी सी आर नमुने हे निगेटिव्ह आलेले असून कोरोना हद्दपार झाल्याचे निष्पन्न झाले. आज या ठिकाणी जिओ जिंदगीच्या वतीने आंबेसावळी व समतानगर येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button