गेवराईबीड जिल्हा

भाजपच्या सरपंच व उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आ.अमरसिंह पंडित यांनी केले स्वागत

वाकनाथपूर आणि परिसरातील विकासाची कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, सिंचन वाढीसाठी बंधारा आणि दळणवळणासाठी गरजेच्या पुलाचे बांधकाम प्राधान्याने करण्यासाठी लक्ष घालणार असल्याचे अमरसिंह पंडित यांनी सांगितले. वाकनाथपूर येथील भाजपच्या सरपंच, उपसरपंच आणि लक्ष्मण खाकरे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.

ग्रुप ग्रामपंचायत वाकनाथपूर, राक्षसभुवन येथील भाजपचे विद्यमान सरपंच गोरख घाडगे, उपसरपंच सुधाकर कानडे आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते लक्ष्मणराव खाकरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी वाकनाथपूर येथील कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांचे वाजतगाजत स्वागत केले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाला अशोकराव लांडे, अशोकराव ढास, रामकिसन आबुज, गणेश कदम, चंद्रसेन पडुळे, वचिष्ट कुटे, पांडुरंग शेंडगे, राधाकिसन पटेकर, प्रल्हादराव बोरवडे, बाबुराव बोरवडे, मस्केतात्या, तुळशीराम खाकरे, नामदेव कानडे, गोवर्धन भंडारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदार संघाची आमदारकी आपल्याकडे नसली तरी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे, त्यामुळे विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही. या भागातील प्रमुख अडचणी असलेल्या कामांना प्राधान्यक्रम देवून यासाठी जाणीवपूर्वक लक्ष घालून विकासाची कामे मार्गी लावू असे सांगतानाच येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठिमागे ताकद उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात वाकनाथपूर ग्रामपंचायतचे भाजपचे सरपंच गोरख घाडगे, उपसरपंच सुधाकर कानडे तसेच शिवसेनेचे लक्ष्मणराव खाकरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन भंडारे, बाबुराव कानडे, तुळशीराम खाकरे, जयराम खाकरे, शिवाजी कानडे, गणेश खाकरे, विक्रम घाडगे, नवनाथ गोरे, राजेंद्र कानडे, नामदेव गोरे, अशोक खाकरे, विक्रम खाकरे, दत्ता खाकरे, शाम घाडगे, मच्छिंद्र घाडगे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास रामकिसन आबुज, राधाकिसन पटेकर, वचिष्ट कुटे, शेख मुखिद, शेख शौकत, अभिमान खाकरे, लक्ष्मण कानडे, रघुनाथ खाकरे, प्रभाकर खाकरे, दिगांबर खाकरे, भास्कर खाकरे, दादासाहेब खाकरे, राम खाकरे, भिमा कानडे, कैलास खाकरे, सुखदेव खाकरे, जालिंदर खाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button