बीडबीड जिल्हा

आ.सुरेश धस मित्रमंडळ व जिओ जिंदगी अभियानाच्या संयुक्त विद्यमाने आंबेसावळी येथे 183 जणांचे कोविड लसीकरण – धनंजय गुंदेकर

बीड ) :- बीड तालुक्यातील आंबेसावळी येथे आ सुरेश अण्णा धस मित्रमंडळ व जिओ जिंदगी अभियानाच्या वतीने ताडसोना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून 183 जणांचे कोरोनाचे लसीकरण समतानगर वस्ती येथील वस्ती शाळेत करण्यात आले आहे. यामध्ये 19 जणांना दुसरा डोस देण्यात आलेला आहे. धनंजय गुंदेकर यांनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे आभार मानले.

आंबेसावळी (गाव) 56, समता नगर वस्ती – 101, मन्यार वाडी – 10, घाट सावळी – 05 इतर गावे – 09
असे लसीकरण करण्यात आलेले आहे. यावेळी ताडसोना मेडिकल ऑफिसर प्रीतम लोध, नारायण पैठणे साहेब, मिसाळ सिस्टर, लाड साहेब, कापसे सर यांनी हे लसीकरण यशस्वीपणे राबविले. त्यांना अंगणवाडी सेविका काळे मॅडम, आशासेविका गुंदेकर काकी, शाळेतील शिक्षक तांदळे सर, कानगावकर सर, घुमरे सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
कागदपत्रे ऑनलाइन करण्यासह शिबिराच्या यशस्वीतेसाठी राजेभाऊ (महेश) गुंदेकर, महेंद्र निसर्गन्ध, प्रल्हाद करांडे, वाणी महेश व अक्षय, बबलू आलाट, अशोक आदिनाथ गुंदेकर, संभाजी रेडे, चक्रधर करांडे, परमेश्वर शिंदे, शरद गुंदेकर, नवाज पठाण, शिंदे, डोंगरे, बांडे, व्यंकटेश गुंदेकर आदींनी मेहनत घेतली. यावेळी धनंजय गुंदेकर यांच्यासह हनुमंत बांडे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष बांडे, ग्रामपंचायत सदस्य निसर्गन्ध, ग्रामपंचायत सदस्य हनुमान शिंदे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अशोक गुंदेकर, बंडू दांडगे, श्रीराम गुंदेकर, अशोक गुंदेकर, गणेश गुंदेकर, शेवाळे, अविनाश गुंदेकर, अजय गुंदेकर, डोंगरे आदींची यावेळी उपस्थिती होती.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button